उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
त्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन
Related News
Kangana Ranaut Controversy: ‘जनरेशन गटर’ म्हणत कंगना रणौतची तरुण महिलांवर टीका; सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद
Kangana Ranaut Controve...
Continue reading
Nagpur Rain : नागपुरात तुफान पाऊस, जनजीवन विस्कळीत; रस्त्यांवर पाणी, सोमलवार शाळेचं मैदान पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
Nagpur Rain ...
Continue reading
मिक्सर सतत होतोय खराब? स्वयंपाकघरातील या 5 गोष्टी मिक्सरमध्ये वाटण्याची चूक करू नका; मोटर आणि ब्लेडचं होऊ शकतं मोठं नुकसान
Kitchen Tips : आजच्या ...
Continue reading
Jantar Mantar Protest : दिल्लीतील आंदोलनावेळी परदेशातून पोस्ट? थेट पाकिस्तान, मलेशिया आणि इतर देशांतून सोशल मीडिया अकाउंट सक्रिय; सायबर सेलचा मोठा खुलासा
Continue reading
CJP Protest : सीजेपी आंदोलकांवर कारवाई होणार की नाही? फडणवीस यांचा पोलिसांना तातडीचा आदेश; महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द होणार
CJP Protest : ...
Continue reading
सेकंड हँड कारचे मायलेज खरे की खोटे? ओडोमीटरमधील फसवणूक अशी ओळखा काही मिनिटांत; कार खरेदीपूर्वी ‘या’ गोष्टी तपासा
Used Car Buying Tips : स...
Continue reading
Maruti Brezza Facelift: मारुती ब्रेझाचे 4 दमदार व्हेरियंट्स; बजेट आणि फीचर्सनुसार तुमच्यासाठी कोणती कार ठरेल बेस्ट?
भारतीय कार बाजारात SUV सेगमेंटची...
Continue reading
E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत नवं आंदोलन; नितीन गडकरी अडचणीत? मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी, 4 ऑगस्टला संसदेला घेराव
NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशाच्या...
Continue reading
शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, सहन करू; पण उद्योजकांना नको! शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, विरोधकांचा संताप
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री
Continue reading
उरलेल्या भाज्या आता वाया जाणार नाहीत! फेकून देण्याऐवजी बनवा हे 4 स्वादिष्ट पदार्थ; झटपट जाणून घ्या रेसिपी
भारतीय घरांमध्ये जेवण बनवल्यानंतर थोडीफार भाजी उरणे ही अगदी सामान्य गोष्ट...
Continue reading
Cabinet Decisions : ग्रामपंचायतीपासून अनुसूचित जातीपर्यंत… महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय; कॅबिनेट बैठकीत नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र...
Continue reading
Narendra Modi Video : मोदींचा व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट झाल्याने राजधानीत खळबळ; मेटाच्या ग्लोबल हेडला समन्स, नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरें...
Continue reading
राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नुकतंच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं या अधिवेशनावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अपयश लपवणारं अधिवेशन होतं, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे
यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची दोस्ती पक्की आहे.
उद्धव ठाकरे बालिशपणा करत आहेत, शिवसेना खरी कोणाची? हे न्यायालयाने आधीच सिद्ध केलं आहे.
आम्ही 80 जागा लढलो 60 जागा जिंकलो, ते फक्त 20 जागाच जिंकले, त्यांच्या हातात आता काही राहिलं नाही,
ते काँग्रेसच्या तालावर नाचत आहेत, असा हल्लाबोल सामंत यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसबरोबर जाऊन त्यांनी बाळासाहेब यांच्यासोबत गद्दारी केली.
सौगात हा मोदींचा उपक्रम आहे. यांनी फेक नरेटीव्ही सेट केला आहे.
आम्ही पाकिस्तानचं समर्थन करत नाही, यांनी कंगनाच्या घरावर कारवाईसाठी बुलडोझर पाठवला.
राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवले. यांनी जे कृत्य केले ते पुसले जाणार नाहीत असं सामंत यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनामध्ये प्रत्येक घोषणेवर चर्चा झाली आहे.
आम्ही आमचा अजेंडा पाच वर्षांमध्ये पूर्ण करणार आहोत.
यांना जे जमले नाही ते आम्ही केले आहे. गिरीश महाजन यांना एका प्रकरणात यांनी अटकवण्याचा प्रयत्न केला.
नुसती विधान भवनात येऊन पत्रकार परिषद घेतात.
यांनी आधी काम पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.