NEET पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती अधिक वाढवली असून संबंधित इतर व्यक्तींवरही कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्राध्यापक मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्यानंतर अकोल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील मोटेगावकर यांच्या क्लासेससमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. “विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी मोटेगावकर यांच्या फोटोला काळे फासले तसेच परिसरातील बॅनर्स फाडून निषेध नोंदवला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
Related News
नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकातून चोरीला गेलेली तब्बल 1 कोटी 53 लाख रुपये किमतीची 'शिवाई' इलेक्ट्रिक बस अमरावती पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून काढत म...
Continue reading
इंदापूरमध्ये विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला;
अनिल पवार यांच्यावर हल्ला : पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात बुधवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात...
Continue reading
अकोल्यातील काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना कथितपणे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आल्याचा गंभीर दावा विधानसभेत करण...
Continue reading
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरदरम्यान वसंत मोरेंना शिंदे गटाकडून मोठी ऑफर मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मोठे पद, कार्यालय आणि राजकीय घडामोडींचा सविस्तर ...
Continue reading
मॅनहोलमध्ये पडून मुंबईकराचा मृत्यू, उपमहापौरांचा BMC आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप
मॅनहोलमध्ये पडून मृत्यू : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार...
Continue reading
ऐरोलीत गर्भवतीचा मृत्यू; '3 तास थांबवलं, तब्येत व्यवस्थित असल्याचं खोटं सांगितलं', पतीचा गंभीर आरोप
नवी मुंबईतील ऐरोली येथील राजमाता जिजाऊ महापालिका रुग...
Continue reading
खाकीला मोठा धक्का! 9 पोलिसांना जन्मठेप; कोठडीतील मृत्यू प्रकरणात तब्बल 15 वर्षांनंतर ऐतिहासिक न्याय
वाशिम जिल्ह्यातील 2011 मधील कोठडीतील मृत्यू प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अत...
Continue reading
मुंबईकरांनो अलर्ट राहा! रस्त्यांवर सक्रिय झालाय 'सायलेंट किलर'; 10 वर्षांत 45 हून अधिक मृत्यू, धक्कादायक सत्य समोर
मुंबई : पावसाळा सुरू झाला की मुंबईकरा...
Continue reading
'खाशाबा' चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित झाला आहे. खाशाबा जाधव यांच्या संघर्षमय आयुष्याची झलक, नागराज मंजुळे यांची भूमिका, कलाकारांची फौज आणि 1 ...
Continue reading
माहिती अधिकार कायद्यातील 12 वादग्रस्त बदलांना स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णायक पुढाकार, अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मोठे यश
महाराष्ट्राती...
Continue reading
मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरी, किंग्ज सर्कल, वडाळा, बीकेसीसह अनेक भागांत पाणी तुंबले. सोशल मीडियावर गाड्या वाहून जातानाचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झ...
Continue reading
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत मोटेगावकर यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे तात्काळ परत करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. अकोल्यात त्यांचे कोणतेही क्लासेस सुरू राहू देणार नाही, अशी ठाम भूमिका देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गात मोठी चिंता निर्माण झाली आहे. नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. पोलिसांचा तपास पुढे सरकत असताना आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
read also : https://ajinkyabharat.com/buddhist-marriage-rites-at-chondi-sohalyat/