मूर्तिजापूर – आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी मूर्तिजापूर येथील वकील संघाच्या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ॲड. सुनील कांबे, उपाध्यक्षपदी ॲड. निलेश सुसतकर तर सचिवपदी ॲड. शरद मेहरे यांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेत बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष डी. एल. देशमुख, माजी सचिव ॲड. पंकज जामनिक आणि अनेक नामवंत वकील उपस्थित होते. यामध्ये ॲड. किशोर माटे, ॲड. टी. एन. येदवर, ॲड. जगन्नाथ गुल्हाने, ॲड. आर. एच. वानखेडे, ॲड. प्रशांत भडांगे, ॲड. जी. पी. वानखडे, ॲड. सत्यजित देशमुख, ॲड. सचिन वानखडे, ॲड. राजेश हजारी, ॲड. पी. पी. पाटील, ॲड. निलेश सुखसोहळे, ॲड. क्षितिज त्रिपाठी, ॲड. संतोष ठाकरे, ॲड. श्रद्धा गुल्हाने, ॲड. राहुल महल्ले, ॲड. सिमरन देवीकर, ॲड. श्रीकृष्ण तायडे, ॲड. मुजम्मिल हुसेन, ॲड. पी. एस. डाबेराव, ॲड. कु गोलाईत, ॲड. अंबालिका गिऱ्हे, ॲड. ज्ञानेश्वरी काकड, ॲड. जया खंडारे, ॲड. संजय अग्रवाल, ॲड. प्राची महल्ले, ॲड. आरिफ शाह, ॲड. विनोद सोनटक्के, ॲड. श्रीपाद गांधी, ॲड. जमादार, ॲड. वैष्णवी पाचळे, ॲड. ए. के. अल्फाज, ॲड. धम्मानंद दहातोंडे, ॲड. अनिश भगत, ॲड. डी. बी. नाईक अशा विविध मान्यवर वकील उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या कार्यकाळात संघाच्या उपक्रमांना नवी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून वकील संघ अधिक सक्रिय व सामूहिक कार्यासाठी सज्ज होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
मूर्तिजापूर वकील संघाची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते निवड

16
Jan