सध्याच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाहन कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित
करण्याची तयारी केली आहे. देशातील एक मोठी कार उत्पादक कंपनी
मारुती सुझुकी (Maruti Suzuki) अनेकदा कार बाजारात काहीतरी
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
नवीन आणण्याचा प्रयत्न करते. आता मारुती सुझुकीने आपल्या प्रसिद्ध
कार स्विफ्टचे सीएनजी मॉडेल (Swift CNG) लॉन्च केले आहे. भारतीय
कार मार्केटमध्ये सीएनजी कारची मागणी वाढत आहे. अशात, मारुती
सुझुकीने स्विफ्ट सीएनजी लाँच करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
केला आहे. स्विफ्ट नेहमीच तिच्या दमदार कामगिरीसाठी आणि आयकॉनिक
शैलीसाठी ओळखली जाते. आता आपली विक्री वाढवण्यासाठी कंपनीने
नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी कारची
एक्स-शोरूम किंमत 8.19 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी,
त्याच्या टॉप मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 9.19 लाख रुपये आहे.
कंपनीने VXI, VXI (O) आणि ZXI व्हेरियंट लॉन्च केल्याची घोषणा केली आहे.
कंपनीने प्रथमच ZXI प्रकार लॉन्च केला आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजीच्या
डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्या पुढच्या बाजूला काचेच्या काळ्या ग्रिल,
15-इंच ड्युअल टोन अलॉय व्हील आणि सी-आकाराचे टेल लॅम्प आहेत. कंपनीने
मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजीचे तीन प्रकार लॉन्च केले आहेत. यासोबतच कारमध्ये
6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि सुरक्षेसाठी हिल होल्ड असिस्ट
सारखी फीचर्स आहेत. मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी कारमध्ये अनेक उत्कृष्ट
फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने 7-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, रियर एसी व्हेंट्स,
वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, ऑटो गियर शिफ्ट,
सुझुकी कनेक्ट फीचर प्रदान केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/statewide-movement-against-rahul-gandhi-and-bjp-today/