पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी पुन्हा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे.
पहलगाम हल्ला भारताने स्वतः घडवून आणला आहे आणि पाकिस्तानवर खोटे आरोप केले आहेत,
असे संतापजनक वक्तव्य त्याने केले आहे. तसेच काश्मीरमध्ये तैनात असलेल्या
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
आठ लाख भारतीय सैन्याने काहीच करू शकले नाही, असा दावा आफ्रिदीने केला आहे.
या बेताल वक्तव्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आफ्रिदीला “जोकर” म्हटले आहे.
तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने आफ्रिदीवर ताशेरे ओढत,
“तो अतिरेकी विचारांशी जोडलेला आहे” असे म्हटले असून भारतीय टेलिव्हिजनवर त्याला स्थान देऊ नये, असा सल्ला दिला आहे.
दरम्यान, माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनीही प्रतिक्रिया देताना,
“भारताने पाकिस्तानसोबत यापुढे क्रिकेट खेळू नये,” असे ठामपणे सांगितले आहे.
“अतिरेक्यांनी दिलेल्या जखमा क्रिकेटमुळे भरून येऊ शकत नाहीत,” असे त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले.
याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कडक पावले उचलली असून, शोएब अख्तरच्या युट्यूब
चॅनेलसह पाकिस्तानचे १६ इतर युट्यूब चॅनेल्स भारतात बंद करण्यात आले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/elphinston-pulachaya-margayal-adha/