शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षासाठी अकोला जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभावाने झालेल्या ज्वारी खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप पक्षाचे
अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप बसू यांच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी एसआयटी चौकशी जाहीर करण्यात आली आहे.
Related News
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शानदार दोन गोलांनंतर एका भारतीय चाहत्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्टेडियममध्ये ठेवून प्रार्थना केल...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट? Viral Video मागील धक्कादायक सत्य समोर; 'फॅक्ट चेक'मध्ये मोठा खुलासा
Vaibhav Sooryavanshi Girlfriend Viral Video Fact Check: भारतीय क्रिके...
Continue reading
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरते संत नरसिंह महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, जी बसू यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे.
फोटोशॉपने बनावट सातबारा, नोंदी वाढवणे, खरी शेतकरी वगळणे, अशा गंभीर प्रकारांमुळे खऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही,
असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे निखिल गावंडे यांनी केला आहे.
ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बाजूला ठेवून, ज्वारी न पेरलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने खरेदी दाखवून शासनाच्या हमीभाव
योजनेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे. रामेश्वर साबळे यांच्यासारख्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांकडे कमी भावाने ज्वारी विकावी लागली.
या प्रकरणावर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आवाज उठवला
आणि मंत्री जयकुमार रावल यांनी तात्काळ एसआयटी चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष कुलदीप बसू यांनी सर्व आरोप फेटाळले असून हे राजकीय हेतूने प्रेरित प्रकरण असल्याचा दावा केला आहे.
मात्र, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरीहितवादी पक्षाच्या जिल्हा नेतृत्वावर फसवणुकीचे आरोप होणं,
ही पक्षाच्या प्रतिमेसाठी मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/buldhana-jilaha-rugnalayat-natewaikamidhye-tufan-hanamari-security-raised-questions/