भारतीय प्रजासत्ताक दिनापूर्वी महावितरणच्या नागपूर परिमंडलाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. काँग्रेस नगर विभागांतर्गत येणाऱ्या दीक्षाभूमी आणि खामला या दोन अत्यंत महत्त्वाच्या 33/11 केव्ही उपकेंद्रांना जागतिक दर्जाचे ‘आयएसओ 9001:2015’ गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. या यशामुळे महावितरणच्या सेवा गुणवत्तेला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे आणि नागपूरमधील ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होणार आहे.
दीक्षाभूमी आणि खामला उपकेंद्र नागपूर शहरातील सामाजिक, ऐतिहासिक व व्यावसायिक दृष्ट्या संवेदनशील भागांना वीज पुरवठा करतात. या उपकेंद्रांत दीक्षाभूमी परिसर, बजाज नगर, श्रद्धानंद पेठ, आठ रस्ता, सेंट्रल बाजार रोड, वसंत नगर, जयप्रकाश नगर, मालवीय नगर, टेलीकॉम नगर, खामला, इंद्रप्रस्थ नगर, कलश अपार्टमेंट आणि दीनदयाळ नगर यांसारख्या गर्दीचे आणि महत्त्वाचे भाग समाविष्ट आहेत. महावितरणच्या ‘इज ऑफ लिविंग’ संकल्पनेनुसार या भागातील ग्राहकांना तांत्रिक बिघाडमुक्त, उच्च दाबाचा अखंडित वीज पुरवठा मिळावा, यासाठी उपकेंद्रांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू होते.
आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवण्यासाठी उपकेंद्रांच्या कामकाजात आमूलाग्र बदल करण्यात आले. यामध्ये सर्व यंत्रसामग्री आणि सुरक्षा प्रणालींची कडक तपासणी व नूतनीकरण, ट्रान्सफॉर्मर व उच्च-दाब व लघुदाब वीज वाहिन्यांची नियमित देखभाल, ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण आणि पारदर्शक कामकाज यांचा समावेश आहे. उपकेंद्र परिसराचे सुशोभीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जागतिक मानके लागू करण्यात आली.
Related News
वीज मीटरवर दिसणारी ‘ही’ खूण नेमकी काय सांगते? बिल कमी होणार की वाढणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
आज जवळपास प्रत्येक घरात वीज मीटर आहे. काळानुसार पारंपरिक मीटरची जागा डिजिटल आणि...
Continue reading
भोरमधील सबस्टेशन प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा – सुप्रिया सुळे
भर पावसात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा
पुणे ज...
Continue reading
पुसद | तालुका प्रतिनिधी – कुलदिप सुरोशे
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात ...
Continue reading
स्मार्ट मीटर आणि वीजदरवाढीविरोधात गडचिरोलीत तीव्र आंदोलन; महावितरण कार्यालयावर मोर्चा, तक्रारींची चौकशी करण्याचे आश्वासन
गडचिरोली : स्मार्ट मीटर, वाढते वीजदर आणि कथित खासगीकरणाच्य...
Continue reading
बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर वीज वितरण कंपनीच्या अखत्यारितील 11 गावांमध्ये कर्मचारी टंचाईमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. एका लाईनमनवर संपूर्ण परिसराची जबाबदारी असल्याने शेतक...
Continue reading
डोणगाव : डोणगाव येथील लोणी गवळी रोडवरील बोरतलाव परिसरात चोरट्यांनी विजेच्या खांबांवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १२ जुलैच्या रात्री अज्ञात ...
Continue reading
विजेच्या धक्क्याने अख्खं कुटुंब संपलं, 4 जणांचा जागीच मृत्यू; साताऱ्यातील हृदयद्रावक दुर्घटनेमुळे परिसर शोकसागरात
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात बुधवारी पहाटे घडलेल्या एका भीषण...
Continue reading
Kalyan-Dombivli News: पहिल्याच पावसात कल्याण-डोंबिवलीची दैना! 5 धक्कादायक वास्तव उघड, नागरिकांचे मोठे नुकसान
कल्याण : यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कल्याण-डों...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धारूर गावात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी नवघन हरी सबाळ यांच्या म्हशीचा इलेक्ट्रिक पोलच्या तानाला (स्टे वायर) करंट लागल्याने जागी...
Continue reading
कल्याणमध्ये हृदयद्रावक घटना! खाऊ आणायला गेलेल्या 24 वर्षीय महिलेचा विजेच्या शॉकने मृत्यू; पोलिसावर 'खर्चा-पाणी' मागणीचा गंभीर आरोप
कल्याण: कल्याण पूर्वेतील हनुमान ...
Continue reading
Maharashtra Solar Scheme : फक्त 2,500 रुपयांत सोलर; वीज बिल शून्यावर आणणारी सरकारची 'स्मार्ट' योजना, जाणून घ्या 7 मोठे फायदे
महावितरणची स्मार्ट योजना! फक्त 2,500 रुपयांत घरावर सोल...
Continue reading
Smart Meter : 'स्मार्ट मीटर नकोच'; अवाजवी वीजबिलांच्या आरोपांमुळे नागरिकांचा संताप, महावितरणविरोधात जोरदार आंदोलन
लोणावळा : राज्यभर स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम वेगाने सुरू असताना...
Continue reading
या यशात उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचा स्वेच्छेने घेतलेला पुढाकार आणि ‘टीम वर्क’ विशेष महत्त्वाचा ठरला. नागपूर परिमंडळाचे प्रादेशिक संचालक श्री. परेश भागवत, मुख्य अभियंता श्री. दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता श्री. अमित परांजपे व कार्यकारी अभियंता श्री. राहुल जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वी झाला.
अतिरिक्त कार्यकारी अभियंते जयंत ठाकरे, प्रशांत काकडे, रमेश नागदेवते, सहायक अभियंते अभिलाष बारापात्रे, प्रशांत शेंडे, राहुल चिंतलवार यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच, यंत्रचालक सुशांत शृंगारे, मंगला भांगे, मुकेश वानखेडे, रवींद्र दुरतकर, उमेश गावंडे, परशुराम दिघोरे, परीक्षित भालेराव व काँग्रेस नगर विभागातील दुरुस्ती पथकाने अहोरात्र परिश्रम घेतले.
महावितरणच्या वरिष्ठ प्रशासनाने संपूर्ण चमूचे कौतुक केले असून, या यशामुळे नागपूरमधील ग्राहकांना अधिक विश्वासार्ह, उच्च दर्जाची वीज सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/prakash-ambedkarancha-5-serious-allegations-against-girish-mahajan-demand-for-withdrawal-of-cabinet-from-cabinet/