अकोला, दि. ५ – महाराष्ट्रातील घरगुती वीज ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. येत्या पाच वर्षांत वीज दरात २३ टक्के कपात केली जाणार असून,
याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या कुशल नेतृत्वाखालील अचूक नियोजनाचे फलित आहे.
विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेले हे पाऊल १३ कोटी महाराष्ट्रवासीयांसाठी कल्याणकारी ठरणार आहे.
Related News
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड…
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या विस्तारामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.
यामुळे केवळ शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा सुनिश्चित होणार नाही तर अपारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल.
यामुळे महाराष्ट्र अधिक ऊर्जावान आणि तेजस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, किशोर पाटील,
जयंत मसणे, विजय अग्रवाल यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा कडेकोट बंदोबस्तात; ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे निगराणी
राज्यात लवकरच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत.
यासाठी शिक्षण विभागाला विशेष निर्देश देण्यात आले असून,
परीक्षेचे आयोजन कॉपीमुक्त व निकोप वातावरणात होईल, याची काळजी घेतली जात आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर दोन ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे २४ तास निगराणी ठेवली जाणार आहे.
परीक्षेच्या काळात ५० मीटरच्या परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत
. प्रशासकीय पातळीवर व्हिडिओ चित्रीकरण, भरारी पथके, आणि फेशियल रेकग्निशन सिस्टीमद्वारे परीक्षार्थींची तपासणी केली जाणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांवरील परीक्षा तणाव कमी होईल, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
याबाबत अकोला भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
READ MORE : https://ajinkyabharat.com/shetak-yancha-jeevanman-achavanyasathi-teaching-tantra-gyan-amending/