अकोला शहराच्या न्यू आळशी प्लॉट येथे राहणारे व्यवसायिक
नवल केडीया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी जबरी चोरी प्रकरणात
3 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
Related News
जिल्हा परिषदेचा कारभार रामभरोसेच!
अकोल्यात उन्हाचा तडाखा! तापमान ४४.२ अंशांवर, राज्यातील सर्वाधिक
माझोड – बाभुळगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार अनुप धोत्रे यांचा पुढाकार;
भाऊसाहेब पोटे विद्यालयात NMMS पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा
‘सहकारातून समृद्धी’ योजनेतून सहकार चळवळीला नवे बळ – नानासाहेब हिंगणकर
सावता परिषदेच्या पातूर तालुका अध्यक्षपदी अजय ढोणे यांची निवड
आर्थिक विवंचनेत अडकलेल्या युवक शेतकऱ्याची आत्महत्या
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
या दरोड्याच्या मास्टर माईंड असलेल्या एका आरोपीला
अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून अटक केली आहे.
हेमंत लुनिया हा मध्यप्रदेशातील कुख्यात रेकॉर्डवरील फरार गुन्हेगार आहे.
अकोला स्थानिक गुन्हे शाखेने इंदौर येथून गुन्हयात वापरलेल्या कारसह
या आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे.
कुख्यात गुंड हेमंत लुनिया याचे विरूध्द मध्यप्रदेश राज्यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न,
दरोडा, जबरी चोरी, अवैध अग्निशस्त्र बाळगणे, डेपो मधून डिझेल चोरी,
अवैधरित्या दारू विक्री, पॅरोल वरून फरार राहणे असे गंभीर स्वरूपाचे
एकुण 21 गुन्हे दाखल आहेत.
10 जुन 2024 रोजी हेमंत लूनिया हा त्याचे साथीदारासह इंदोर (भारत पेट्रोलीयम)
ची पाईप लाईन फोडून त्यामधून मोठ्या प्रमाणात डिझेलची चोरी करून
फरार होवून नाशिक येथे आला होता. येथेच त्यांनी केडीया दरोड्याचा प्लॅन (कट) रचला असल्याची माहिती आहे.
सदर कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे,
पो. नि. शंकर शेळके, स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला
पो.उप नि. गोपाल जाधव, पो. अंमलदार अब्दुल माजीद सुलतान पठाण,
रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, वसीम शेख, खुशाल नेमाडे,
गोकूळ चव्हाण, मोहम्मंद आमीर, शेख अन्सार, स्वप्नील यखेडकर,
चालक पो. हवा प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे यांनी केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/thiyya-movement-of-farmers-in-akola-agriculture-superintendents-office/