यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ मधील आर्णी परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एक मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. नागपूर-तुळजापूर महामार्गावर सुकळी फाट्याजवळील धाब्यावर छापा टाकून सुमारे ३० किलो ड्रग्ज बनविण्याचे पावडर आणि एम.डी. (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला काही दिवसांपूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती की महामार्गालगत असलेल्या एका धाब्यावर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा करून त्यांची विक्री केली जात आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि आर्णी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सुमारे चार वाजताच्या सुमारास सापळा रचत संयुक्त कारवाई केली. Nayara Energyच्या ‘नायरा पेट्रोल पंपा’जवळील धाब्यावर टाकलेल्या या छाप्यात पोलिसांना दीड पोते, म्हणजेच अंदाजे २५ ते ३० किलो संशयास्पद पावडर आणि एम.डी. ड्रग्ज आढळून आले.
जप्त करण्यात आलेला पदार्थ नेमका कोणता आहे, याची खात्री करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तांत्रिक तपासणी सुरू होती. प्राथमिक अंदाजानुसार हा साठा ड्रग्ज निर्मितीसाठी वापरला जाणारा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना आंतरराज्य स्तरावर कार्यरत असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा धागादोरा मिळण्याचीही शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
Related News
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्...
Continue reading
20 वर्षांचा लढा जिंकूनही प्रशासनाकडून पिळवणूक; नैराश्यातून पुसद येथील वनमजुराची यवतमाळमध्ये आत्महत्या
यवतमाळ : वनमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी तब्बल 2 दशके संघर्ष करणाऱ्या पुसद ये...
Continue reading
Nagpur Crime: 3 मित्रांचा धक्कादायक ड्रग्ज प्लॅन फसला; हॉटेलवर पोलिसांची मोठी धाड, एमडीसह रंगेहात अटक
नागपूरच्या रामदासपेठ येथील नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या एमडी (मेफेड्रोन)...
Continue reading
बीड Crime News : आचारी म्हणून काम करून घरी परतणाऱ्या 21 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; क्षुल्लक वादातून चाकूहल्ला, मित्र गंभीर जखमी
बीड : महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगा...
Continue reading
नाशिकच्या देवळा तालुक्यात पोलिसांनी 14.92 लाखांचा अवैध गुटखा जप्त केला. रिमोट कंट्रोलने नंबर प्लेट झाकून पोलिसांना चकवा देणाऱ्या हायटेक तस्करीचा मोठा भांडाफोड. एक आरोपी अटकेत, मुख्...
Continue reading
अकोल्यात अकस्मात मृत्यूचा बनाव करून खून लपविण्याचा प्रयत्न एलसीबीने अवघ्या 3 तासांत उधळून लावला. पैशांच्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक.
अकोल्यातील धक्कादायक खू...
Continue reading
Akola News : पैशाच्या व्यवहारातून मैत्रीचा दुर्दैवी शेवट; 3 तासांत पोलिसांनी उघड केला खुनाचा धक्कादायक बनाव
मित्राचा खून ( अकोला ): अकोला शहरात पैशाच्या व्यवहारातून सुरू झालेल्या ...
Continue reading
'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येदलापूर शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली. छाप्यात ती...
Continue reading
मुंबईतील गिरगाव येथे पोलिसांनी उघड केलेल्या हायप्रोफाइल देहव्यापार रॅकेटमध्ये मराठी अभिनेत्री, बंगाली मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टचा सहभाग समोर आला. एका रात्रीसाठी दोन लाखांचा सौदा, पो...
Continue reading
मुंबई : गिरगावातील कथित देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश; दोन अभिनेत्रींची सुटका, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट अटकेत
मुंबईच्या गिरगावातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित देह व्यापार रॅके...
Continue reading
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात आठ आरोपींच्या घरांवर पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केली. तपासात मालमत्ता, रोकड आणि अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
...
Continue reading
नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मालधक्का परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ सोमवारी सकाळी एका तरुणाचा गळा चिरले...
Continue reading
दरम्यान, सुमारे चार महिन्यांपूर्वी नगर परिषदेचे आरोग्य सभापती अनवर पठाण यांनी शहरात अवैध ड्रग्ज विक्री होत असल्याची लेखी तक्रार पोलिसांकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणेदार सुरटकर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई पार पाडली. पोलिसांनी धाबा चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे आर्णी परिसरात अमली पदार्थांचे जाळे किती खोलवर रुजले आहे, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवत पुरवठा साखळी, संबंधित आरोपी आणि संभाव्य नेटवर्क यांचा शोध घेण्यावर भर दिला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/bhupen-kumar-borah-joins-bjp-major-change-in-assams-politics-due-to-shocking-government-decision-5-important-results/