लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल – तुमचे ₹1500 बंद होणार का?

लाडकी बहीण योजनेत 6 मोठे बदल – 9 लाख महिलांचा लाभ बंद होणार?

विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत.

नवीन अटींनुसार, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना तसेच

चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

Related News

मुख्य बदल:

  1. उत्पन्न मर्यादा – वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ बंद.
  2. वाहन निकष – कुटुंबात चारचाकी गाडी असल्यास योजनेस अपात्र.
  3. शासकीय नोकरीतील महिलांना लाभ नाही.
  4. परराज्यात विवाह झालेल्या महिलांना लाभ मिळणार नाही.
  5. दरवर्षी ई-केवायसी आणि हयातीचा दाखला आवश्यक.
  6. आधार लिंक नसलेल्या महिलांना लाभ नाकारला जाणार.

9 लाख महिला होणार अपात्र

याआधी 5 लाख महिलांचे अर्ज बाद झाले होते. आता आणखी 4 लाख महिलांचा

लाभ बंद होणार असून, सरकारला यामुळे 945 कोटी रुपयांची बचत होणार आहे.

1500 रुपये बंद होणार का?

ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नाही, ज्या एकावेळी इतर योजनांचा लाभ घेत आहेत

किंवा बँक खात्यावरील नाव अर्जातील नावाशी जुळत नाही, अशा महिलांचा लाभ थांबवला जाणार आहे.

तपासणी सुरू

नमो योजना किंवा दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकत्रित 1500 रुपयांपेक्षा

अधिक मिळणार नाही. यासाठी सर्व विभागांकडून माहिती संकलन सुरू आहे.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/satanavan-sajal-vihir-appeared-day/

Related News