अकोली जहागीर (अकोलखेड) येथील श्री संत गजानन महाराज संस्थान,
शांतीवन अमृततीर्थ सजल विहीर परिसर प्रकट दिन महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांच्या
लाखोंच्या उपस्थितीने गजबजून गेला.
Related News
पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे ...
Continue reading
अकोट-अकोला रोडवरील देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
हा अपघात 13 तारखेला रात्री घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. मात्र अद्यापही अपघाता...
Continue reading
कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठी असलेल्या वसाहतींना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आ...
Continue reading
गेल्या तीन दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरात शिव शाहू फुले आंबेडकर विचार पोहोचवणारे सामाजिक सामाजिक ब्रिगेडचे
प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर नुकताच अक्कलकोट येथे काही मा...
Continue reading
कुरणखेड (ता. बाळापूर) – पोटाची खडगी भरण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या 25 वर्षीय शेतमजुराचा
ताणखेड-खडका मार्गावर रात्रीच्या सुमारास दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ...
Continue reading
अकोला - विदर्भ स्तरीय अभया एकल महिला चांदूर रेल्वे येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था,
वंचित विकास - पुणे, उदयकाळ फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्ष...
Continue reading
अडगाव बु. – सन 2024 च्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिक विमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात
अद्यापही विम्याची रक्कम जमा न झाल्याने, शेतकरी संघटनेने कृषी अधिक्षक शंकर किरवे यांना...
Continue reading
अकोट
समाजातील विविध क्षेत्रात अविरत पणे कार्य करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ अकोट चा वर्ष २०२५-२०२६ करिता
शपथविधी समारोह मोठ्या उत्साहात डिस्टिक्ट ३०३० च्या प्रमुख अधिकाऱ्यांच्य...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी "ऑपरेशन प्रहार" मोहीम पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.
या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जुने...
Continue reading
वरळी डोम येथील मेळाव्यात केलेल्या “मारहाण करतानाचा व्हिडीओ काढू नका” या वक्तव्यावरून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात महाराष्ट्र DGPकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
त्रिभाषा...
Continue reading
अकोला शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात आज हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील
पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली;
तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषे...
Continue reading
श्रावण महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थीला अकोला पासून सुमारे १६ ते १७ किमी अंतरावर असलेल्या गायगाव
येथील गणपती मंदिरात श्री गणेश भक्तांची मोठी गर्दी जमते.
आजही अकोल्यातील शेक...
Continue reading
गुरुवारी सकाळपासूनच श्रींच्या आणि सजल विहिरीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पहाटे ४ वाजल्यापासूनच पायी वारीतील भक्तांची वर्दळ सुरू झाली होती,
तर संध्याकाळपर्यंतही दर्शनासाठी भाविकांची गर्दी अविरत होती.
श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
प्रगट दिन उत्सवानिमित्त सकाळी श्रींच्या अभिषेकानंतर, रजत मुखवट्याच्या पालखीची नगरपरिक्रमा पार पडली.
सकाळी १० वाजता ह.भ.प. केशव महाराज उखळीकर (परळी वैजनाथ) यांचे काल्याचे कीर्तन झाले,
तर महायज्ञ अनुष्ठानानंतर पूर्णाहुती सोहळा पार पडला. या प्रसंगी महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.
सजल विहीर परिसरात भव्य यात्रा
यात्रेत पंचक्रोशीतील अंबाडी, रुधाडी, केलपाणी, धारगड, दहीखेल, पोपटखेड,
अकोट, बोर्डी, शिवपूर आदी गावांतून हजारो भाविक सहभागी झाले. विशेषतः
आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
२० हजार स्क्वेअर फुटांचे भव्य सभागृह
भाविकांसाठी सजल विहीर परिसरात २० हजार स्क्वेअर फुट क्षमतेचे भव्य सभागृह उपलब्ध करण्यात आले आहे.
महाप्रसादासाठी हे सभागृह मोठ्या संख्येने भाविकांनी वापरले.
सुमारे एक लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याची माहिती आहे.
मोफत वाहन सेवा व विविध संस्थांची सेवा
अकोट येथून येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे चालक-मालक संघटनेच्या वतीने मोफत वाहन सेवा उपलब्ध होती.
तसेच, विविध सामाजिक संस्थांनी चहा, फराळ, लिंबूसरबत आणि महाप्रसादाचे वाटप करून सेवाभाव जपला.
कडक पोलीस बंदोबस्त
भाविकांच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे अकोट ग्रामीण पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षक बचनसिंग,
उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल आणि ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या
मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
“गण गण गणात बोते” च्या जयघोषात भाविकांनी घेतले दर्शन!
संपूर्ण परिसर गजानन महाराजांच्या जयघोषांनी दुमदुमून गेला. भक्तांच्या सेवेसाठी विविध सुविधा
उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांनी प्रकट दिन महोत्सवाचा आनंद घेतला.
Click here for more updates :https://ajinkyabharat.com/dhananjay-mundenna-bells-palsy-ha-azar-nemka-kya-ai/