आंतरराष्ट्रीय खरेदीदार विदर्भात प्रथमच वायगांव हळदीच्या शेतात

केशरी-पिवळसर, पटकन नजरेत भरणारी, मातीचा गंध असणारी

पिवळीधम्मक वायगांव हळद आता ‘वायगांवची हळद’ अशी नवी

ओळख घेऊन जगाच्या बाजारात दिमाखात प्रवेश करत आहे. या

Related News

हळदीला भौगोलिक उपदर्शन नोंदणी विभागाने अखेर भौगोलिक

मानांकन (जीआय) दिले. विदर्भाच्या कृषी उत्पादनांच्या

निर्यातीसाठी एक महत्त्वाची पाऊल उचलताना, युनिव्हर्स

एक्सपोर्टचे संस्थापक शेतकरी पुत्र प्रविण चांगदेवराव वानखडे

यांनी दुबई / दक्षिण आफ्रिकेच्या अवर वेलनेस व्हिलेजच्या डॉ. रीना

सुकदेव यांना आमंत्रित केले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना

आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवण्यासाठी, डॉ. सुकदेव यांनी

शेतकऱ्यांच्या शेताला थेट भेट देऊन निर्यातीसंबंधी चर्चा केली.

त्यांच्या दौऱ्यात कृषी विभाग नागपूर आणि वर्धा यांची महत्त्वाची

भूमिका बजावली. वर्ध्यातील विविध शेतकरी उत्पादक

कंपन्यांसोबत चर्चा करण्यासाठी एक सत्र आयोजित करण्यात

आले होते, ज्यामध्ये वायगाव हळद उत्पादक कंपनी, विदर्भ

नैसर्गिक शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषिकोन्नती शेतकरी

उत्पादक कंपनी सहभागी झाले. या चर्चासत्रानंतर वायगाव आणि

इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या हळदीच्या शेतात भेट देण्यात

आली. तसेच श्री. पंकज भगत व सौ. शोभा गायधने आणि

पितांबर भूमडे त्यांनी त्यांचे वायगाव हळदी बद्दलचे विचार व्यक्त

केले आणि महत्त्व पटवून दिले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू

असलेल्या धडपडीला अखेर यश मिळाले. यूनिवर्स एक्सपोर्ट्स चे

संस्थापक प्रविण वानखडे यांच्या अथक परिश्रमाने वायगावं हळद

गेल्या अनेक वर्षांपासून आंतरार्ष्ट्रीय बाजारपेठेत आणि प्रदर्शनीत

दुबई / सौदी अरेबिया अशा विविध ठिकाणी प्रचार व प्रसार करीत

असतात. इतर हळदीच्या तुलनेत वायगावची हळद सर्वोत्कृष्ट

औषध गुणधर्म असलेली हळद म्हणून ओळखली जाते. वायगाव

हळदीतील कर्क्यूमिनचे प्रमाण ६% पेक्षा अधिक आहे. वायगाव

हळद हा सौंदर्य प्रसाधनांमध्ये एक अत्यंत उपयुक्त घटक आहे.

तसेच डॉ. रीना सुकदेव म्हनाले, की दक्षिण आफ्रिका / दुबई मध्ये

हळदीला सुपरफुड असे म्हणतात व हळदीचा वापर टरमरिक

लाटेचा उपयोग करतात. जागतिक नामांकन असलेली वायगाव

हळद उत्पादनाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त मागणी आहे,

तसेच येणाऱ्या हंगामात दुबई येथे निर्यात करनार असे डॉ. रीना

सुकदेव म्हनाले. वायगावच्या हळदीने इंग्लंडला चांगलीच भुरळ

घातली आहे. पाश्चिमात्य देशातही हळदीचे दूध पिण्याचा

स्वास्थ्यविचार बळ धरीत असल्याने ब्रिटनकडून या हळदीची निवड

करण्यात आली. तसेच पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने हळदीचे उत्पादन

घेतले जाते. हळदीची चव, सुगंध व रंग सर्वोत्कृष्ट असल्याचे

प्रमाणित झाले आहे. तेलाचे प्रमाण अधिक असणारी वायगावी

हळद इतर हळदीच्या तुलनेत उजवी ठरली आहे. ही हळद एक

जिल्हा एक उद्पादक मधे येते. कर्करोग प्रतिबंधक कर्क्युमीन हे

मूलद्रव्य या हळदीत मोठ्या प्रमाणात असतात. त्यावर डॉ.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिक्कामोर्तब केल्यावर ही

हळद सोन्यासारखी झळाळली. २०१४ला तिला भौगोलिक

मानांकन (जी. आय. इंडेक्स) प्राप्त झाले. (जी. आय. क्रमांक

४७१) डॉ. भोयर आणि डॉ. गोडघाटे यांनी स्मार्ट प्रकपाच्या अंतर्गत

येणाऱ्या कंपंन्यांच्या मार्फत व्यवसायाला जोडणी करण्याबाबत

मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्वक

उत्पादने उत्पादित केल्यास निर्यातीस मोठा वाव आहे असे

सांगितले. प्रविण वानखडे शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने काम

करत आहेत आणि त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांच्या

उत्पादनांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. या

सर्व उपक्रमांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना निर्यात प्रक्रियेत

सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या

उत्पादनांची मागणी स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत

वाढली आहे. वानखडे हे भारतातील प्रथम शेतकऱ्यांच्या कृषी

मालाचे प्रतिनिधित्व करणारे कृषी निर्यातदार आहेत. कृषि विभाग

नागपुर येथील विभागीय नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प च्या

श्रीमती प्रज्ञा गोड़घाटे, डॉक्टर नलिनी भोयर प्रकल्प संचालक

आत्मा वर्धा, मनोज गायधने कृषी पर्यवेक्षक गिरड तालुका समुद्रपूर

जिल्हा वर्धा, सत्यपाल ठाकरे, बलराम बलगमवार आणि यूनिवर्स

एक्सपोर्ट्सचे सहकारी मध्यमा सवाई, नेहा मेश्राम, प्रशिक आनंद,

नक्षित्रा रायपूरे, दीप चौधरी, गीतेश निमजे, प्रज्वल रायबोले आदि

उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/terrorist-crackdown-in-jammu-and-kashmir/

Related News