शालेय प्रशासन, ऑनलाईन कामे व पोषण योजनेवर चर्चा
अकोट – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला यांच्या निर्देशानुसार माहे नोव्हेंबर २०२५ ची बोर्डी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पीएमश्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, बोर्डी पं.स.अकोट येथे सकाळी ११ ते २ वाजता यशस्वीरीत्या संपन्न झाली. व्यासपीठावर केंद्रप्रमुख उमेश चोरे सर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक काजी अतिक सर आणि बुलडाणा जिल्हा समुपदेशक व तज्ज्ञ मार्गदर्शक अरविंद शिंगाडे सर उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे औपचारिक उद्घाटन प्रतिमापूजनाने झाले.
परिषदेचे पहिले मार्गदर्शन जिल्हा समुपदेशक अरविंद शिंगाडे यांनी “शालेय नेतृत्व व आजच्या काळातील शिक्षकाची भूमिका” या विषयावर केले. त्यानंतर डॉ. जयंत नारळीकर व विनोद तळोकार सरांनी गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाबाबत शिक्षकांचे मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा क्र. ३ उपक्रमाची माहिती महेंद्र काकड सरांनी दिली, तर SQAAF विषयांतर्गत आनंद नांदुरकर सरांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
केंद्रप्रमुख उमेश चोरे सरांनी प्रास्ताविक, प्रशासकीय सूचना व स्थलांतरित बालक व पालकांचे सर्वेक्षण याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांमध्ये UDISE, संच मान्यता, ऑनलाईन कामे, विद्यार्थी सुरक्षा, VSK ॲपवर उपस्थिती नोंदविणे, PAT परीक्षेचे गुण ऑनलाईन भरने, हिंदकी चादर निपुण ॲपवर पालकांचे मोबाईल नंबर नोंदणी, शालार्थ प्रणालीवरील शिक्षक माहिती अपडेट करणे, प्रधानमंत्री पोषण शकती योजनेत मेनू चार्टनुसार आहार बनविणे व दैनिक उपस्थिती वेळेत भरणे यासंबंधी चर्चा झाली.
Related News
अकोटमध्ये करंट लागून म्हशीचा मृत्यू, धारूर गावातील दुर्दैवी घटना; शेतकऱ्याला मदतीची मागणी
धावत्या स्कूल व्हॅनमधून 4 मुले रस्त्यावर पडली; CCTV मध्ये कैद झालेली घटना, सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह
“भीषण उन्हात अकोट-कुटासा बस बंद! प्रवाशांचे 5 धक्कादायक हाल, एसटी प्रशासनावर संतापाचा भडका”
पुण्यात मद्यधुंद स्कूल बस चालकाचा भीषण थरार—50 विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात वाचला!
7 तास उन्हात ताटकळत उभे शेतकरी! सावरा येथे युरिया खतासाठी भीषण रांगा, बळीराजाचा संताप अनावर
केनियातील भयंकर शाळा आग दुर्घटना: 16 विद्यार्थिनींचा मृत्यू, 79 जखमी; वसतिगृहातील भीषण अग्नितांडवाचा धक्कादायक अहवाल
“अकोट अकोला नाका ब्रिजवर 5 धक्कादायक समस्या: भीषण तळे, गंभीर अपघाताचा ‘अलर्ट’ रिपोर्ट”
चोहोट्टा बाजारात विनापरवाना वीट भट्ट्यांवर कडक कारवाई
NMMS राट्रीय स्तरावरील परीक्षेत भाऊसाहब पोटे शाळेचे नेत्र दिपक यश
अकोट : रोटरी क्लबच्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ८०४ रुग्णांची तपासणी
शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर खापरकर यांनी केले. बोर्डी केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला आणि चर्चेत सक्रियतेने भाग घेतल्यामुळे परिषद यशस्वी ठरली.
