भारतीय सैन्यदलातील विविध पदांवर सेवा देऊन
निवृत्त झालेले माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना
दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी एक्स-सर्व्हिसमेन कंट्रिब्युटरी हेल्थ स्कीम (ईसीएचएस)
Related News
अंतर्गत वानडोंगरी येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे
यापुढे आरोग्य उपचार कवच दिले जाणार आहे.
या अनुषंगाने स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी G20 शिखर परिषद
आणि नॅशनल सायन्स काँग्रेस दरम्यान मेघे रुग्णालयाची हेल्थ पार्टनर म्हणून निवड केली होती.
त्यानुसार झालेल्या या सामंजस्य करारावर ईसीएचएस विभागीय केंद्राचे संचालक
आणि ग्रुप कॅप्टन सोनी अक्कारा, जॉईंट डायरेक्टर (मेडिकल) कर्नल अजय कुमार पांडे,
जॉईंट डायरेक्टर (इस्टॅब्लिशमेंट) लेफ्टनंट कर्नल मनोज शेट्टी,
मेघे रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत गावंडे,
डॉ. सुधीर सिंग, वित्त अधिकारी अमित प्रजापत, व्यवस्थाक सुनील सुरे यांनी स्वाक्षरी केली.
त्यामुळे यापुढे माजी सैनिकांसह, लष्करी दलातील पेन्शनधारक,
त्यांच्या कुटुंबीयांना आता मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सारख्या रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.
नागपूर येथे झालेल्या या कार्यक्रमाला भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांडमध्ये
सिनियर एअर आणि ऍडमिनिस्ट्रेशन स्टाफ ऑफिसर म्हणून कार्यरत
अति विशिष्ट सेवा मेडल आणि शौर्य चक्र पुरस्कार विजेते
एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर विशेष उपस्थित होते.
सुनील सुरे यांनी सूत्रसंचालन केले.
अश्विन रडके, डॉ. नुरूल आमीन, डॉ. रुचा ढोणे, डॉ. रिचा शर्मा, डॉ. सीमा सिंग,
निरज कलिहरी आणि अमरेंद्र जैन उपस्थित होते.
Read also: https://ajinkyabharat.com/alia-bhattchis-entry-in-yrf-spy-universe/