पाकिस्तानशी संपर्क साधणाऱ्या अभियंत्याला न्यायालयाने सुनावली शिक्षा
नागपूर: पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात टाकणाऱ्या ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीतील अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल (२८) याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तीन वर्षे कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर आणि प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला.
निशांत अग्रवाल नेहरूनगर, रुडकी (उत्तराखंड) येथील मुळ रहिवासी असून भारत-रशिया संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीच्या नागपूर प्रकल्पात सिस्टिम इंजिनियर पदावर कार्यरत होता. तो उज्ज्वलनगर येथील भाड्याच्या घरात राहत होता.
सत्र न्यायालयाने त्याला ३ जून २०२४ रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-एफ अंतर्गत जन्मठेप, शासकीय गुपिते कायद्याच्या कलम ३(१)(सी) अंतर्गत १४ वर्षे, तर कलम ५(१)(ए)(बी)(सी)(डी) आणि ५(३) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर अग्रवालाने या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केली होती.
Related News
3 वर्षे तुरुंगात राहिलेल्या सतीश उकेचा धक्कादायक दावा! फडणवीसांना क्लीन चिट, ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात वेळोवे...
Continue reading
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याच्यासोबत कोलकात्यात एक धक्कादायक घटना घडली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका सार्वज...
Continue reading
Nagpur News : धक्कादायक! खेळता खेळता 11 वर्षीय मल्हारचा दुर्दैवी मृत्यू; बंद खोलीचं दार उघडताच कुटुंबीयांना बसला जबर धक्का
नागपूर : नागपूर शहरातील प्रत...
Continue reading
सारंग लखानींचा दमदार डान्स : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रेवती यांचा विवाह नागपूरमधील उद...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरात घडली हृदयद्रावक घटना
छत्रपती संभाजीनगरात घडली हृदयद्रावक घटना : छत्रपती संभाजीनगर शहरातील सिल्कमील कॉलनी परिसर गुरुवारी रक्तरंजित घटन...
Continue reading
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भातील शाळा १५ किंवा २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय रद्द केला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, तीव...
Continue reading
मोठा दिलासा! विदर्भातील शाळा तब्बल 7 दिवस उशीरा सुरू; शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रा...
Continue reading
NEET MDS 2026: 5 तास झोप, अथक मेहनत आणि AIR-1; नमिरा सिद्दिकीची प्रेरणादायी यशोगाथा
देशात नंबर 1! नागपूरच्या नमिरा सिद्दिकीने NEET MDS 2026 मध्ये घडवला ऐ...
Continue reading
‘Hai Jawani Toh Ishq Hona Hai’वरून मोठा वाद; वाशू भगनानींची 400 कोटींची याचिका, डेव्हिड धवन आणि टिप्स इंडस्ट्रीज अडचणीत?
‘Hai Jawani ...
Continue reading
पुणे कोर्टाचा मोठा निर्णय! ‘MBA पत्नीला पोटगी का द्यावी?’ पतीचा सवाल फेटाळत न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
पुणे : वैवाहिक आयुष्यातील मतभेद, सततचे वाद आणि घ...
Continue reading
तपासानुसार, अग्रवाल पाकिस्तानमधून नेहा शर्मा आणि पूजा रंजन या नावाने फेसबुक तसेच सेजल कपूर नावाने लिंक्ड-इन अकाऊंट चालवत होता. लखनौ एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार, अग्रवाल भारताच्या सुरक्षा विभागातील काही कर्मचार्यांशी संपर्क साधत होता. त्यानुसार त्याला ८ ऑक्टोबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती.
सदर प्रकरणातून भारताच्या संरक्षणात्मक यंत्रणेला गंभीर हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/new-vice-chancellor-of-agricultural-school-dr-vilas-kharche/