हरिद्वार | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हरिद्वार-देहरादून महामार्गावर एका महिलेने अचानक महामार्गाच्या मध्यभागी
येऊन गाड्यांसमोर उभी राहत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
Related News
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
C-390 विमाने आता भारतातच; महिंद्रा आणि एम्ब्रेअरमध्ये सामरिक भागीदारी
गुरुग्राममध्ये हृदयद्रावक घटना: वडिलांच्या गोळीबारात उदयोन्मुख टेनिसपटू राधिकाचा मृत्यू
बार्शीटाकळीतील साडेसात कोटींचा रस्ता दोन महिन्यात उखडला;
ओडिशात ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी पास-फेल पद्धत पुन्हा लागू;
बार्शीटाकळीच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद सन्मान
“गुरुपौर्णिमेला शिंदेंची दिल्ली वारी, शाहांच्या चरणांवर टीका” – संजय राऊतांचा हल्लाबोल
सर्पदंश झालेल्या युवा शेतकऱ्याला पिंजर ते अकोला 40 मिनटातच केले रुग्णालयात दाखल
विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश
या घटनेमुळे दोन गाड्यांमध्ये धडक होऊन एका कारचे नुकसान झाले.
सध्या या प्रकरणात पोलिसांनी कोणताही अधिकृत खुलासा केलेला नसला तरी सोशल
मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महामार्गावर थेट गाड्यांना थांबवत केली अजब कृत्यं
सदर महिला लाल रंगाचा सूट घालून महामार्गावर उतरली व गाड्यांना थांबवत समोर जाऊन काहीतरी
बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येते. तिच्या या वर्तनामुळे अचानक गाड्या
थांबवाव्या लागल्याने दोन कार एकमेकांना धडकल्या. या अपघातात एका कारच्या बोनटचे मोठे नुकसान झाले आहे.
नशेत असल्याचा संशय, स्कुटीवर बसून निघून गेली महिला
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, महिला नशेच्या अवस्थेत होती. तिच्या अजब आणि आक्रमक वर्तनामुळे
कोणीही तिला थांबवण्याची हिम्मत केली नाही. ही घटना पंतदीप पार्किंगजवळ बराच वेळ सुरू होती.
नंतर ती महिला एका स्कुटीवर बसून घटनास्थळावरून निघून गेली.
पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही
या प्रकरणात अजूनपर्यंत पोलिसांकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.
तसेच कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर
संबंधित महिलेवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महिला ज्या कारच्या अपघातास कारणीभूत ठरली, त्या कारच्या मालकाला नुकसानभरपाई मिळू शकते, असे देखील बोलले जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidh-goodfriends/