गोरखपूरच्या सहजनवा पोलीस ठाण्याच्या बाहिलपार गावात हृदयद्रावक घटना घडली आहे.
अंगद शर्मा नावाच्या पतीने आपल्या पत्नी नेहा हिचा गळा चिरून खून केला आणि सुमारे एक
तास तिच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. नंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन थानेदाराला सांगितले,
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
“मी माझ्या पत्नीचा खून केला आहे, मृतदेह घरी आहे.”
पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, नेहा चा रक्ताने माखलेला मृतदेह बेडवर आढळला.
फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले असून, तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात,
खुनाचे कारण अफेअरच्या संशयावरून झालेला वाद असल्याचे समोर आले आहे.
अंगद कर्नाटकात वाढईचे काम करत होता. दोन वर्षांपूर्वी त्याने गावातीलच नेहा हिच्याशी प्रेमविवाह केला होता.
दोघांच्या जाती वेगळ्या असल्याने कुटुंबीयांनी विरोध केला होता, त्यामुळे त्यांनी मंदिरात लग्न केले.
काही काळ ते कर्नाटकमध्ये राहिले, नंतर गावात परतले. नेहा गीडा परिसरात राहून वाहन एजन्सीत काम करू लागली.
दोन महिन्यांपूर्वी अंगद परत आल्यावर त्याने नेहाला फोनवर कुणाशी तरी बोलताना पाहिले आणि त्यावरून वाद होऊन ही थरारक घटना घडली.
Read Also : https://ajinkyabharat.com/lucknow-kanpur-rapid-rail-project-hirwa-kandil-ldacudon-noc-approved/