सोने-चांदीने फुंकली महागाईची तुतारी; Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर किंमती भडकणार?

 डोनाल्ड ट्रम्प हे दुसर्‍यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी आले. त्यानतंर आता सोने-चांदीच्या किंमती भडकणार का?

असा सवाल विचारण्यात येत आहे. ट्रम्पमुळे शेअर बाजार आणि क्रिप्टो करन्सीत मोठा बदल झाला आहे.

18K, 22K, 24K सोन्याचा भाव जाणून घ्या… डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रं दुसर्‍यांदा हाती घेतली.

Related News

भांडवलशाही आणि उद्योगांचे हितचिंतक म्हणून ट्रम्प ओळखले जातात.

त्यांनी सूत्र हाती घेताच शेअर बाजारासह क्रिप्टो करन्सी बाजाराला आनंदाचे भरते आले आहे.

तर आता सोने आणि चांदीच्या किंमती भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर काही जण किंमती कमी होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.

लवकरच बाजारात त्याची प्रतिक्रिया दिसेल.  भारतीय बाजारात सोने वधारले. तर चांदीची किंमत

जैसे थे दिसली. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव आता असा आहे.

सोन्यात दरवाढीचे सत्र

गेल्या आठवड्यात सोने 1730 रुपयांनी महागले. अखेरच्या सत्रात सोने घसरले होते.

15, 16 आणि 17 जानेवारी रोजी सलग 110, 550 आणि 650 रुपयांनी सोने महागले.

तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 120 रुपयांनी किंमती वधारल्या.

गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत तीन दिवसांपासून शांतता

गेल्या आठवड्यात चांदी चार हजार रुपयांनी महागली. तर 2 हजारांनी किंमती उतरल्या.

18 जानेवारीपासून आतापर्यंत तीन दिवसांत चांदीत कोणताही बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार

(IBJA) 24 कॅरेट सोने 79,345 23 कॅरेट 79,027, 22 कॅरेट सोने 72,680 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 59,509 रुपये,

14 कॅरेट सोने 46,417 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,200 रुपये इतका झाला.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते.

तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/trump-took-the-oath-of-office-and-gave-the-first-blow-to-close-friend-of-the-country/

 

Related News