रेहान पार्कपासून अबरार प्लॉटपर्यंत मुख्य नाल्यात साचलेली घाण, आरोग्यावर गंभीर परिणाम

नाल्या

शिर्ला ग्रामपंचायतीतील मुख्य नाल्याची दुर्व्यवस्था : आरोग्यास गंभीर धोका

पातूर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य नाल्याची दुरवस्था नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहे. रेहान पार्क येथून वाहणारा हा नाला समी प्लॉट, बादशाह नगर, अकबर प्लॉट, गुलशन कॉलनी, गाडगे वाडी आणि अबरार प्लॉट अशा घनदाट परिसरातून जातो. नाल्यात साचलेली घाण, कचरा, झुडपे व वनस्पतीमुळे पाणी वाहत नाही, ज्यामुळे डेंगू, मलेरिया आणि टायफॉइड यांसारखे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांनी बीडिओ व ग्रामपंचायत सचिवांना निवेदन सादर केले असून, तातडीने नाल्याची साफसफाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीकडे पर्याप्त निधी असूनही नाल्याची साफसफाई केली गेलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून परिसरात दुर्गंधी, डास व घाण वाढली आहे.

स्थानिक नागरिक शेख शकील शेख बशीर यांनी अबरार प्लॉट, पातूर येथील नाल्याची साफसफाई न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, दरवर्षी ही नाले वेळेवर साफ केली जात असत, मात्र यावर्षी नाल्याची साफसफाई न झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, डासांची संख्या वाढली आहे आणि घाण मात्र वाढली आहे. या परिस्थितीमुळे ते व परिसरातील इतर रहिवासी अत्यंत त्रस्त झाले आहेत.

Related News

पातूर नाल्यात डेंगू-मलेरियाचा धोका वाढला, ग्रामपंचायत निष्क्रिय

इंजमाम आ अमीनोद्दीन, गुलशन कॉलनी, पातूर यांनी सांगितले की, नाल्यात साचलेली घाण आणि दुर्गंधी तसेच पावसामुळे उगवलेल्या झाडांमुळे पाणी योग्यप्रकारे वाहत नाही. या कारणास्तव डासांची संख्या वाढत आहे आणि साफसफाई न झाल्यामुळे निर्माण झालेली घाण त्यांच्या आणि परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहे.

निवेदनात नागरिकांनी मुख्य नाल्याची त्वरित साफसफाई करून परिसरातील आरोग्य सुरक्षीत करण्याची तातडीची मागणी केली आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीने या समस्येकडे त्वरीत लक्ष देऊन कार्यवाही करावी, असे नागरिकांनी आग्रह धरला आहे.

या नाल्याची वेळेत साफसफाई न केल्यास डेंगू, मलेरिया आणि टायफॉइडसारखे आजार परिसरात वेगाने पसरू शकतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती आहे. प्रशासनाने त्वरित आणि योग्य ती उपाययोजना करून नाला स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून या आजारांच्या प्रसाराला रोखता येईल आणि परिसरातील लोकांची आरोग्यसुरक्षा सुनिश्चित केली जाईल.

read also:https://ajinkyabharat.com/a-popular-habit-of-american-and-european-soldiers-to-reduce-drinking-stress-in-the-global-military/

Related News