मुर्तिजापूर तालुक्यातील भगोरा परिसरातील शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांपासून अनियमित वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मर जळणे आणि सिंचन खोळंबणे या तीव्र समस्यांना सामोरं जावं लागत आहे. DTC क्रमांक 4283108 वरून जाणारी LT लाईन अत्यंत लांब व वळणदार मार्गाने टाकण्यात आल्याने तांत्रिक अडथळे वाढले असून त्याचा गंभीर परिणाम शेतीवर होत आहे.
लांब-वळणदार लाईनचा ‘तगडा फटका’ पिकांना
स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या LT लाईनचा मार्ग घनदाट झाडीतून गेल्यामुळे झाडांच्या फांद्या वारंवार लाईनला स्पर्श करतात,लाईन ट्रिप होऊन व्होल्टेज डाऊन होते,परिणामी ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत आहेत,काही दिवसांनी एकदा ट्रान्सफॉर्मर बदलावा लागत असल्याने वीजपुरवठा खंडित होतो,यामुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची वेळ बिघडणे, पिके कोमेजण्याची स्थिती आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
शेतकऱ्यांचा आक्रोश – “लाईन सरळ न झाल्यास संकट टळणार नाही”
शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली प्रमुख मते “लाईन सरळ मार्गाने आणली, तर ट्रान्सफॉर्मर जळण्याचं प्रमाण निम्म्यावर येईल.”“डि-बॉक्स सतत बिघडतो; सरळ लाईन असल्यास तांत्रिक दोष कमी होतील.”“वीजपुरवठा स्थिर असेल तर सिंचन वाचेल; अन्यथा पिकांचे नुकसान अटळ आहे.”अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की, रोजच्या रोज वीजपुरवठ्याची अनिश्चितता आणि सतत होणाऱ्या बिघाडामुळे खर्च वाढतोय पण उत्पादन घटत आहे.
Related News
वीज वितरण कंपनीकडे तातडीची मागणी
स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी वीज विभागाकडे खालील मागण्या लेखी स्वरूपात केल्या आहेत:LT लाईन सरळ मार्गाने पुन:टाकणी करावी,मार्गातील झाडी–झुडपे तत्काळ हटवावीत,तांत्रिक क्षमता वाढवून अधिक ‘लोड’ सहन करणारे ट्रान्सफॉर्मर द्यावेत,डी-बॉक्सचे पूर्णपणे नूतनीकरण करावे,शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे—“सध्याच्या मार्गाने जात असलेली लाईन हीच सर्वात मोठी अडचण आहे.”
शेतकरी संघटनांचा इशारा : उपाय न झाल्यास आंदोलन
परिसरातील शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला कडक शब्दात चेतावणी दिली आहे:“जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडू.”ग्रामसभेतही या मुद्द्यावर तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून पुढील पावले?
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक तांत्रिक तपासणी सुरू केल्याची माहिती मिळते. मात्र लाईनची सरळ पुनर्रचना,
झाडांची छाटणी,
ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ,
याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.
परिसरातील नागरिक आणि शेतकरी यांचे लक्ष आता प्रशासन कोणती तातडीची पावले उचलते याकडे लागले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/apple-layoff-2025-layoff-in-apple-despite-bumper-earnings/
