महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज दिल्लीत होणार आहे.
या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय होऊ शकते.
लोकसभा निवडणुकीत सडकून पराभव झाल्यानंतर
फडणवीसांनी पराभवाची जबाबदारी घेऊन आपल्याला पक्षानं राज्यातील सरकारमधून मुक्त करावं
अशी मागणी करत राजीनामा दिला होता.
तसंच राजीनाम्यानंतर आपण पक्ष बळकटीसाठी काम करण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.
केंद्र सरकारच्या शपथविधीपूर्वी फडणवीसांनी दिल्लीला जाऊन
गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राजीनामा देण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं.
पण शहा यांनी त्यांना तुर्तात थांबण्यास सांगितलं होतं.
सत्तास्थापनेनंतर याबाबींवर निर्णय घेता येईल असंही त्यांनी म्हटलं होतं.
पण देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजीनाम्यावर अद्यापही ठाम आहेत.
आजच्या दिल्लीतील बैठकीत भाजपची कोअर कमिटी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी
विशेष रणनीती तयार करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला फडणवीसांनी आपल्या डोक्यात
विधानसभेसाठी विशेष रणनीती असल्याचं म्हटलं होतं.
तसंच ही रणनीती प्रत्यक्षात आणण्यासाठी
आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात
किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर ऑक्टोबरमध्येच नवं सरकारही सत्तेत येईल.
या प्रक्रियेला आणि आचारसंहितेला केवळ अडीच ते तीन महिनेच शिल्लक राहिलेले असताना
जर फडणवीसांचा राजीनामा स्विकारला गेला
तरी सरकारला विशेष फरक पडणार नाही,
किंवा या काळात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाही.
त्यामुळे आजच्या बैठकीत फडणवीसांचा राजीनामा स्वीकारल्या जाण्याची शक्यता आहे.
Read also: राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियंका वायनाडमधून लढणार! (ajinkyabharat.com)