अकोला :महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने आर्थिक वर्ष २०२५–२०२६ ते २०२९–२०३० या कालावधीसाठी महावितरणने सादर केलेल्या सुधारित वीज दरवाढीच्या प्रस्तावाबाबत नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या असून, २ जानेवारी २०२६ पासून राज्यातील सहा प्रमुख शहरांमध्ये जनसुनावणी आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सनातन संस्कृती महासंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून प्रस्तावित वीज दरवाढीला विरोध दर्शविला आहे. या निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष ऋषीकेश जकाते व उपाध्यक्ष अमित शिरसाट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर आधीच तुलनेने अधिक आहेत. त्यामुळे अनेक उद्योग अन्य राज्यांकडे वळत असल्याचे चित्र दिसून येते. वीजचोरीवर नियंत्रण, वीज गळती रोखणे तसेच आस्थापना खर्चात कपात करण्याबाबत यापूर्वीही विविध सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र महावितरणकडून अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. परिणामी, दर पाच वर्षांनी दरवाढीची प्रक्रिया राबविली जात असून त्याचा आर्थिक भार वीज ग्राहकांवर पडत आहे.
महावितरणची अनेक रोहित्रे, वीज वाहिन्या व खांब कालबाह्य झाल्याने तसेच मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे वीजपुरवठ्यात वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. रोहित्र बिघाड, खांब कोसळणे व वीज खंडित होण्याच्या घटना घडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अखंड वीजपुरवठा व दर्जेदार सेवा देण्याचा उद्देश प्रत्यक्षात प्रभावीपणे अमलात येत नसल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे.
Related News
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनापूर्वीच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; SIR नंतर वगळलेल्या पात्र मतदारांना पुन्हा संधी, नवमतदारांचाही मतदार यादीत समावेश
देशभरात सध्या निवडणूक आयोगाकडून मतदा...
Continue reading
वीज मीटरवर दिसणारी ‘ही’ खूण नेमकी काय सांगते? बिल कमी होणार की वाढणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
आज जवळपास प्रत्येक घरात वीज मीटर आहे. काळानुसार पारंपरिक मीटरची जागा डिजिटल आणि...
Continue reading
आधी हरितालिका पूजन की गणेश चतुर्थीचे पूजन? पंचांगकर्त्यांनी सांगितला शास्त्रशुद्ध मार्ग; जाणून घ्या योग्य पूजा वेळ
यंदा गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच एक विशेष योग आला आहे. १४ सप्टेंब...
Continue reading
Bank Strike : ग्राहकांनो सावधान! आजपासून 3 दिवस सरकारी बँका बंद; कर्मचारी संपावर, गणेशोत्सवापूर्वी व्यवहारांवर परिणाम
Bank Strike : देशभरातील सरकारी बँक कर्मचारी आजपासून ...
Continue reading
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला का? राज ठाकरेंचा थेट सवाल; कलाकारांना केलं आवाहन
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरस्कार सोहळा दिल्ल...
Continue reading
तुकाराम मुंढेंची ‘हवा’! रवीना टंडनला रेस्टॉरंटमध्ये आला भन्नाट अनुभव; म्हणाली, ‘आता भीतीच संपली!’
प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि धडाकेबाज ...
Continue reading
भोरमधील सबस्टेशन प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; प्रकल्प रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द द्यावा – सुप्रिया सुळे
भर पावसात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा
पुणे ज...
Continue reading
माज, दादागिरी तुमच्या राज्यात..; मराठी भाषेचा विरोध करणाऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता
Mumbai Auto Driver Dispute : महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहार...
Continue reading
पुसद | तालुका प्रतिनिधी – कुलदिप सुरोशे
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात ...
Continue reading
मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद! 7 ते 9 ऑगस्ट 'वनरंग 2026'मध्ये 4 जमाती, 12 राज्यांचा सहभाग
वनरंग 2026 : महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीतील नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण से...
Continue reading
निवासी डॉक्टरांच्या संपावर हायकोर्टाचा मोठा दणका; ‘संप तात्काळ मागे घ्या, एका रुग्णाचाही जीव जाता कामा नये’
मुंबई : निवासी डॉक्टरांच्या आंदोलनावर हायकोर्टाचे कडक निरीक्षण, 8 सप्टे...
Continue reading
स्मार्ट मीटर आणि वीजदरवाढीविरोधात गडचिरोलीत तीव्र आंदोलन; महावितरण कार्यालयावर मोर्चा, तक्रारींची चौकशी करण्याचे आश्वासन
गडचिरोली : स्मार्ट मीटर, वाढते वीजदर आणि कथित खासगीकरणाच्य...
Continue reading
युनिट दरांव्यतिरिक्त स्थिर, वहन, इंधन समायोजन व इतर विविध आकारणी सामान्य ग्राहकांसाठी गुंतागुंतीच्या असल्याचे नमूद करत, वीज ही अत्यावश्यक सेवा असूनही तिचा आर्थिक बोजा वाढत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. वीज दरवाढीला मान्यता देण्याचा अधिकार वीज नियामक आयोगाचा असला, तरी नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने जनहितार्थ हस्तक्षेप करून वीज दरवाढ थांबवावी तसेच महावितरणला दर्जेदार व तत्पर सेवा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ही माहिती महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड व देवानंद गहिले यांनी दिली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/demand-to-rename-murtijapur-as-debunagar-launch-of-jaaniv-manavatechi-campaign/