फटाकेमुक्त दिवाळीचा आनंद वृद्धाश्रमात उमलला : धनत्रयोदशीच्या पावन दिवशी आणि दिवाळीच्या उंबरठ्यावर, मातोश्री वृद्धाश्रमाच्या अंगणात एक भावस्पर्शी आणि समृद्ध उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत विचारसाहित्य संमेलन समिती व राष्ट्रधर्म युवा मंच, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेला “फटाकेमुक्त आनंदाची दिवाळी” हा उपक्रम यंदाही वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचा फुलोरा उमटवून गेला.
वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी-आजोबांसाठी दिवाळी अनेकदा एकाकीपणाची आणि अपराधगंडाची ठरते. पण संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या मानवतावादी विचारांनी प्रेरित हा उपक्रम त्यांच्या आयुष्यात नवी आशा आणि आनंदाची भावना निर्माण करतो. “भुकेल्याला अन्न आणि एकट्याला सहवास” हेच या कार्यामागचं मुख्य सूत्र आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहून उत्साह वाढविणारे प्रमुख मान्यवर होते – प्रा. दादाराव पाथ्रीकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी श्री. शरदभाऊ वानखडे, समाजसेवक श्री. गजाननभाऊ हरणे, निवृत्त ट्रेझरी ऑफिसर डॉ. पार्थजी गिरी, डॉ. रामेश्वर बरगट, ज्ञानेश्वर साकरकार, पत्रकार अजय डांगे, सचिन माहोकार यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते.
Related News
2026 चा ‘लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती प्रेरणा पुरस्कार’ राणी खंडागळे यांना; खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांच्या हस्ते भव्य सन्मान
सामाजिक क्षेत्...
Continue reading
गुजरातच्या इतिहासातील 7 धक्कादायक सत्य! जूही चावलाच्या सासरच्यांनी आर्थिक संकटात सरकारला कशी दिली मोठी मदत?
बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला ही केवळ आप...
Continue reading
Mother Son Dies : लेकाचं पार्थिव पाहून आईचा श्वास थांबला; एकाचवेळी दोघांना अखेरचा निरोप, कुटुंबाचा डोळेदानाचा स्तुत्य निर्णय
मध्य प्रदेशातील इ...
Continue reading
पुण्यातील ३ वर्षांच्या बालकाचे अवयवदान ठरले ऐतिहासिक; दोन मुलांना नवे जीवन, दोन अंधांना दृष्टी
पुण्यातून एक अशी घटना समोर आली आहे जी केवळ वैद्यकीय क्ष...
Continue reading
सहजीवनाची प्रेरणादायी 44 वर्षे! ॲड. लखनसिंह कटरे आणि सौ. उषादेवी कटरे यांच्या यशस्वी संसाराचा गौरवशाली प्रवास
दोन व्यक्तींचे एकत्र येणे आणि आयुष्यभर सुख-...
Continue reading
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून आमरण उपोषण सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या समाजाच्या पुढील पिढीच्या हितासाठी त...
Continue reading
मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हास्यातून उमटली बाबासाहेबांना खरी आदरांजली; महावितरणचा अनोखा ‘सेवा उत्सव’
नागपूर, दि. 13 एप्रिल 2026 : समाजातील वंचित, दुर्बल आणि विशेष घटकांच्या उन्नतीस...
Continue reading
विद्युत सेवेसोबतच माणुसकीचा प्रकाश! नागपुरात १४ एप्रिलला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
सामाजिक बांधिलकी जपत आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नागपुरातील महावितरणच्य...
Continue reading
अकोला: समाजातील वंचित आणि तळागाळातील घटकांसाठी, विशेषतः अनाथ व गरजू बालकांसाठी मायेची ऊब देणारे कार्य करणाऱ्या तिक्ष्णगत मल्ट...
Continue reading
नागपूर: भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा करून काही दिवसांपूर्वी सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यां...
Continue reading
इतर सेलिब्रिटींपेक्षा वेगळी ठरली Vijay Deverakonda-Rashmika Mandanna यांची जोडी; लग्नसोहळ्यासोबतच समाजाचीही घेतली विशेष काळ...
Continue reading
राष्ट्रधर्म युवा मंचचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साबळे, युवती शाखा अध्यक्षा कु. सुरभी दोडके, ऍड. वैष्णवी हगवणे, डॉ. बबलू तायडे, राजेश गावंडे,पडघामोल , सुशांत निलखन, गाडगे दादा, टेकाम साहेब, आशिष फोकमारे, निमजे , अंबादास वानखडे, भुजाडे साहेब आदींनी उत्सवाला आत्मीयतेचा रंग भरला.
मातोश्री वृद्धाश्रमाचे मुख्य व्यवस्थापक युवराज गावंडे व संपूर्ण व्यवस्थापन समितीने या उपक्रमासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ही दिवाळी फटाक्यांच्या आवाजात नव्हे, तर करुणा, आपुलकी आणि सहवासाच्या दीपज्योतीत उजळली. वृद्धाश्रमातील प्रत्येक वृद्धाच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून स्पष्ट झाले की खरी दिवाळी तिथेच साकारली गेली.
read also : https://ajinkyabharat.com/notorious-criminal-mithun-alias-monty-caught-with-1-country-made-pistol-and-sword/