स्थानीक गुन्हे शाखेची अचूक कारवाई
अकोला – पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी एका कुख्यात गुन्हेगाराला देशी कट्टा, जिवंत काडतूस व तलवारसह अटक केली आहे.गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि माजीद पठाण, विष्णु बोडखे यांनी पथकासह चिवचिव बाजार परिसरात छापा टाकला.या कारवाईत आरोपी मिथुन उर्फ मॉन्टी सुधाकर इंगळे (४५) रा. चिवचिव बाजार, अकोला) याच्या घरातून लोखंडी धातूचा देशी कट्टा (अग्निशस्त्र), एक जिवंत काडतूस, लोखंडी तलवार व लोखंडी कत्ता असा एकूण ३१ हजार ३०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे शस्त्र विनापरवाना जवळ बाळगत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी आरोपीवर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके, स.पो.नि विजय चव्हाण, पोउपनि माजीद पठाण, विष्णु बोडखे, तसेच पो.हे.कॉ शेख हसन, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, किशोर सोनुने, एजाज अहमद, वसीमोददीन, भास्कर धोत्रे, पोकॉ अशोक सोनुने, श्रीकांत पातोंड, पोहवा प्रशांत कमलाकर यांच्या संयुक्त पथकाने केली.
या यशस्वी कारवाईनंतर अकोला पोलीस दलाने पुन्हा एकदा शहरातील गुन्हेगारीवर कडक अंकुश आणल्याचे दाखवून दिले आहे.
read also :https://ajinkyabharat.com/u200bkhaparkhed-fatyawar-car-and-autos-horrific-accident-1-prawashacha-jagich-dead/
Related News
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कार डिव्हायडरला धडकून ट्रकवर आदळली, 4 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
Pune-Satara Highway Accident : पुणे-सातारा महामार्गावर...
Continue reading
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
मनोज जरांगे पाटील : डिफेंडर गाडीवरील आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांचा जोरदार पलटवार; 29 ऑगस्टच्या लढाईची हाक
सांगली : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज...
Continue reading
Tukaram Munde: तुकाराम मुंढेंचा मेडिकल स्टोअर्सला कडक इशारा! 5 गोळ्यांसाठी 10ची सक्ती केली तर परवाना रद्द?
मुंबई : अन्न आणि औषधांच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेणारे अन्न व औषध प्...
Continue reading
शिवसेना प्रकरणात मोठा ट्विस्ट! 3 मुद्द्यांवर कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सवाल
मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष आणि पक्षचिन्हावरून निर्माण झालेल्य...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
TET पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; 16वा आरोपी प्रकाश पवार अटकेत, सोलापूर कनेक्शन उघड
TET Exam Scam Solapur : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी...
Continue reading
1500 आदिवासींच्या मृत्यूचा संजय राऊतांचा गंभीर दावा; ‘5 मिनिटांत बॉडी गायब होते’गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं; खा...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
सुदैवाने मोठं संकट टळलं! मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील 2-3 वाहनांचा अपघात; जखमी कार्यकर्त्याला स्वतः रुग्णालयात नेले
सांगली : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते
Continue reading
अनिशा माजगावकर पुन्हा मनसेत सक्रिय, भांडूपच्या जागेवर राज ठाकरेंची खंत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांमध्ये...
Continue reading
‘तुझा मित्र मुलीला पळवून घेऊन गेलाय, कुठे आहे सांग?’; तरुणाला मारहाण केल्याचा आरोप, संभाजीनगरात खळबळछत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू अस...
Continue reading