दानापूर (वा) – महसूल विभागाच्या पुढाकाराने आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर”
अभियानाला तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जनतेच्या विविध तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी आणि महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,
Related News
तुकाराम मुंढेंचा ‘दणका’! Domino’s नंतर Parle Agro गोदामावर 11 तास धाड; Frutiy, Appy Fizzसह ₹1 लाखांहून अधिक माल जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयएएस अधिकारी
Continue reading
मुख्यमंत्र्यांनाही अटक करणाऱ्या ‘वाघीण’ IPS रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कहाणी
IPS रूपा मौदगिल : महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न व औषध प...
Continue reading
वेबसिरीज पाहून पत्नीच्या हत्येचा धक्कादायक कट; तलवार लपवून 12.75 लाख रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न, अखेर पती अटकेतनवी दिल्ली : दिल्लीतील गगन विहार परिसरात एका विवाहितेच्या हत्येप...
Continue reading
मराठवाडा-विदर्भ रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठी चालना! खासदार अनुप धोत्रेंची रेल्वे बोर्डाकडे 10 महत्त्वपूर्ण मागणी
अकोला/नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट 2026 : मराठवाडा आणि विदर्भातील रेल्व...
Continue reading
महिलांना 50 हजारांची आर्थिक मदत? योगी सरकारच्या ‘मास्टरप्लॅन’ची जोरदार चर्चाउत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 जवळ येत असताना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले...
Continue reading
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
नांदेड : पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री
Continue reading
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! राष्ट्रीय कार्यकारिणीवरून कपिल सिब्बलांचा शिंदे गटाला सवाल
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कुणाची, पक्षावरील नियंत्रण क...
Continue reading
रात्री Wi-Fi च्या शोधात बाहेर पडली अन् समोर आला थरारक पाहुणा! 5 धक्कादायक गोष्टी जाणून घ्या ‘आयाळ असलेल्या लांडग्या’बद्दल
अकोला : जगाच्या कानाकोपऱ्यात आजही असे अनेक वन्यजीव आढळतात...
Continue reading
‘महाखनिज-2’ पोर्टलवरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारीअवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; डिजिटल ट्रॅकिंग, हायटेक क...
Continue reading
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने हे शिबीर जिल्हा परिषद शाळा, मालेगाव बाजार येथे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
शिबिरात एकूण १२७ दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सीमाताई अढाऊ होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सलीम खान शब्बीर खान, पोलीस पाटील रितेश ठाकूर, श्री. संतोष माकोडे (दानापूर),
वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकोडे, मंडळ अधिकारी श्री.ओमप्रकाश वेरूळकर, ग्राम महसूल अधिकारी
श्री. वारूळकर , पत्रकार, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. महसूल विभागामार्फत श्री. वेरूळकर यांनी मार्गदर्शन केले.
विविध विभागांमार्फत सेवा व माहिती:
महसूल विभाग: जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत वारस नोंद अद्ययावत करणे, सातबारा/आठ गाव नमुना सहा वाटप.
पुरवठा विभाग: शिधापत्रिका वाटप, घरकुल धारकांना ५ ब्रास मोफत रेती यासंदर्भात माहिती.
आरोग्य विभाग: गोल्डन कार्ड वितरण.
महिला व बालविकास विभाग: विविध उपक्रमांची माहिती व ‘बालसंगोपन’ विषयावर मार्गदर्शन.
कृषी विभाग:
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केळी लागवड.
अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना.
महाडीबीटी योजनांची माहिती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रा. मह. अधिकारी श्री. अंकुश मानकर यांनी केले.
या शिबिरामुळे ग्रामीण जनतेच्या समस्या थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे त्वरित निराकरण झाले.
यामुळे उपस्थित नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/pimphkhuta-shanta-pravesh-festival-crosses-enthusiasts/