देशातील आणीबाणीला आज ५० वर्षं पूर्ण झाली असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी वृत्तपत्रात एक विशेष लेख लिहून काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे.
“२५ जून १९७५ हा भारतीय लोकशाहीच्या हत्येचा काळा दिवस होता,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Related News
फडणवीस लेखात म्हणतात, “आणीबाणीने देशातील अनेक कुटुंबं उद्ध्वस्त केली.
संविधान आणि लोकशाही मूल्यांचा अपमान झाला. माझे वडील गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती.
आम्हाला लहान वयात त्यांच्यापासून दूर राहावं लागलं. त्यामुळे मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या.”
ते पुढे म्हणतात, “लोकशाही आणि संविधानावरील श्रद्धा त्या संघर्षातून अधिक दृढ झाली.
त्या काळात संघर्ष न केला असता तर आज भारतात हुकूमशाही असती.”
फडणवीसांच्या या लेखाने पुन्हा एकदा आणीबाणीच्या काळातील आठवणींना
उजाळा दिला असून, राजकीय वातावरणात तापमान वाढवले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivaji-maharajasv-samadhan-shibir-abhiyan-la-jantecha-fils/
