बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.

बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.

अकोट शहर प्रतिनिधी..

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या बुलडाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक

ऊर्फ भाईजी यांच्या प्रेरणे ने अकोला विभागाच्या वतीने ९ जून सोमवारला सायंकाळी ५.३० वाजता ज्ञानदेवा मंगलम अकोला रोड,

Related News

अकोट येथे शेतकरी मेळावा व संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .

सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने बुलडाणा अर्बन संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, अकोट

विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटचे

सभापती प्रशांतभाऊ पाचडे, ह. भ. प. गुरुवर्य तुकाराम महाराज (सखारामपुरकर), ह. भ. प. शुकदास महाराज गाडेकर,

अखिल भारतीय गुरुदेव मंडळ तथा संचालक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रम पाटसुळ,

तसेच बुलढाणा अर्बन अकोटचे स्थानिक संचालक गोकुळदास चांडक आदींची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी उपस्थित शेतकरी बांधव, संस्थेचे ग्राहक, सभासद, यांना संस्थे विषयीच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे

तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांचा सत्कार होणार आहे.

तरी अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधव, संस्थेचे ग्राहक सभासद व नागरिकांनी बहुसंख्येने

उपस्थित राहण्याच्या आव्हान अकोला विभागाचे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल दळवी यांनी केले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/rejected-kelly-repo-darat-kapat/

Related News