नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात 0.50
टक्क्यांची कपात करण्याची घोषणा करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात
रेपो रेटमध्ये 0.25% कपात केली होती.भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात 0.50 टक्के कपात केली.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर सलग तिसऱ्यांदा कपात करण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिल 2025 महिन्यात रेपो दरात 0.25-0.25 टक्के कपात करण्यात आली होती.
त्यामुळे रेपो दर 6.50 वरून 6 टक्क्यांवर आला होता. आता त्यात 0.50 टक्क्यांची कपात झाल्याने रेपो
दर 5.5 टक्क्यांवर आला आहे. यामुळे गृहकर्जापासून वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील ईएमआय कमी होण्याची दाट शक्यता आहे.
या वर्षाच्या 2025 मधील पहिल्या सहामहीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
EMI वर 1 टक्का म्हणजे 2,974 रुपयांचा दिलासा मिळेल. पण त्यासाठी सर्व बँकांना रिझर्व्ह
बँकेच्या धोरणाप्रमाणे व्याज दरात कपात करावी लागणार आहे. * कोणत्या बँकांनी किती स्वस्त केले कर्ज?*
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI):
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँकेने कर्ज दरात 0.25% पर्यंत कपात केली आहे.
या 15 एप्रिल पासून ही कपात लागू झाली.
HDFC बँक:
खासगी क्षेत्रातील HDFC बँकेने कर्जाच्या व्याजदरामध्ये कपात केली आहे.
HDFC ने फेब्रुवारी 2025 पासून आतापर्यंत एकूण 0.50% ची कपात केली आहे.
इंडियन ओव्हरसीज बँक :
या बँकेने रेपो दरामध्ये झालेल्या कपातीच्या अनुषंगाने आपला बेंचमार्क कर्जदर 6.25% वरून 6% पर्यंत कमी केला आहे.
पंजाब नॅशनल बँक :
देशातील दुसर्या क्रमांकाची सरकारी बँक, PNB ने व्याज दरांमध्ये 0.25% पर्यंत कपात केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jcb-driver-tarunachi-garfas-lavoon-suicide/