वाडेगाव : भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय अधिवेशन ओडिशा राज्यातील कटक येथे दि. २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान होणार होते. या अधिवेशनासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. मात्र, ओडिशा राज्य सरकारने ऐनवेळी परवानगी रद्द केल्यामुळे हे राष्ट्रीय अधिवेशन रद्द करावे लागले. त्यामुळे देशभरातून आलेले हजारो कार्यकर्ते माघारी परतले असून संघटनेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिक नुकसान झाले आहे.
संविधानाच्या अनुच्छेद १९ नुसार शांततेत सभा, आंदोलन व आपले मत मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. असे असतानाही ओडिशा राज्य सरकारने कोणतेही ठोस कारण न देता परवानगी रद्द केल्याने लोकशाही मूल्यांवर घाला घातल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चा व बामसेफच्या वतीने करण्यात आला आहे. या निषेधार्थ बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी देशभरातील कार्यकर्त्यांना आंदोलनाचे निर्देश दिले.
त्या अनुषंगाने बुधवार दि. २२ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करण्यात आले. अकोला जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात ओडिशा सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Related News
अकोला शहरातील खदान परिसरातील ख्रिश्चन कॉलनी येथे असलेल्या सानिया उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी (25 जून) सकाळी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस ...
Continue reading
अनिस शेख : महान प्रतिनिधी,,महान येथील कल्पना कॉलनी मधील रहिवाशी दीपक सेवकराम ठाकरे वय 35 वर्ष हा वीज वितरण कंपनी मध्ये कंत्राटी कामगार...
Continue reading
NEET पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती अधिक वाढवल...
Continue reading
अकोल्यात पाल्म संडे हर्षोेेल्हासात, भक्तिभावाने साजरा
अकोला: ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र परंपरेतला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पाल...
Continue reading
अकोला: समाजातील वंचित आणि तळागाळातील घटकांसाठी, विशेषतः अनाथ व गरजू बालकांसाठी मायेची ऊब देणारे कार्य करणाऱ्या तिक्ष्णगत मल्ट...
Continue reading
अकोला – स्थानिक विभाग नियंत्रक कार्यालयात सोमवारी, 23 मार्च 2026 रोजी एसटी कष्टकरी जनसंघाच्या वतीने नवीन विभाग नियंत्रक सौ स्मिता सुतवणे यांचा ज...
Continue reading
अकोला शहरातील खडकी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या गोडाऊनला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य ज...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील सौदळा–वारखेड शेतशिवार परिसरात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घालत एका रात्रीत सहा जनावरांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील अडगाव बु शेतशिवारातील अल्पभूधारक शेतकरी शशिकांत वैजनाथ तंबारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तीन एकर शेतात पिकवलेल्या हरभऱ्याच्या पीकाची गंजी रात्री अज्ञात इस...
Continue reading
वाडेगाव: केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध वाडेगाव बस स्थानक परिसरात बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी सकाळी सुमारे ११ वाजता शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्य...
Continue reading
यावेळी आंदोलनात भारत मुक्ती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष श्याम अवचार, ओबीसी मोर्चाचे राज्याध्यक्ष गजानन दोड, योगेश जायले, विनोद सिरसाठ, मुजंबिल शेख, इकबाल शाहिद, देवानंद अवचार, गजानन वाकोडे, रवि सरदार, देवेंद्र सिरसाठ, गौतम काकडे, चंद्रमणी अंभोरे, गोविंद दाभाडे, नाजुकराव शेगोकर, वंदना अवचार, किरतकार मॅडम यांच्यासह अकोला जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लक्षणीय होती.
दरम्यान, ओडिशा सरकारच्या भूमिकेविरोधात पुढील टप्प्यात दि. २२ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील आर.एस.एस. मुख्यालयावर घेराव घालण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलन शांततेत पार पडले.
read also: https://ajinkyabharat.com/laborer-gets-7-cr-tax-notice-shocking-truth-garib-majurala-7-crore-income-tax-notice-shocking-dysfunction-of-the-system-exposed/