बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर
कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात
देण्यात आली. उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणात स्युमोटो याचिका
Related News
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरे...
Continue reading
ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनतेची खप्पामर्जी?
८९ टक्के अमेरिकन नागरिकांना वाटतोय सरकारमध्ये व्यापक भ्रष्टाचार; दोन दशकांतील उच्चांक
वॉशिंग्टन : अमेरि...
Continue reading
कोल्हापुरात तुफान राडा! राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थक आमनेसामने; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा च...
Continue reading
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही ग...
Continue reading
1 डॉलरच्या नाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो; अमेरिकेत नव्या नाण्यावरून कायदेशीर आणि राजकीय वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या छायाचित्राचा समावेश असलेले
Continue reading
7.8% GDP वरून देशात चर्चा; पंतप्रधान मोदींचं पुन्हा भाष्य, भारत-बेल्जियम सहकार्यावर भर
GDP : भारत दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Mumbai–Pune बुलेट ट्रेनची घोषणा! दिवसातून दोनदा वडापाव-बाकरवडी खाण्यासाठी जाता येणार; 2027 मध्ये पहिली एसी लोकल धावणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; मुंबईसाठी 238...
Continue reading
EV कारचे टायर पेट्रोल-डिझेल गाड्यांपेक्षा लवकर गुळगुळीत का होतात? जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणं आणि टायरची झीज रोखण्याचे उपाय
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशभरात इले...
Continue reading
विद्यानंद बापटांवर हल्ला का केला? हल्लेखोर संतोष चव्हाणने सांगितले कारण; VIDEO समोर
गणेशोत्सव, डीजे आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून वाद; हल्ल्यानंतर फरार झालेल्या संतोष चव्हाणला पोलि...
Continue reading
एक्सपायरी डेट म्हणजे निव्वळ शाई नव्हे, तो तर विश्वासघात! Tukaram Mundhe यांचा भेसळखोरांना सज्जड इशारा
Tukaram Mundhe : अन्नपदार्थ आणि औषधांमध्...
Continue reading
दाखल करुन घेतली होती. या याचिकेवर गुरुवारी तातडीची सुनावणी झाली.
तेव्हा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलीस आणि राज्य सरकारच्या कारभारावर
ताशेरे ओढले. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे,
अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला चपराक लगावली.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यावेळी राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या महाअधिवक्ता
बीरेंद्र सराफ यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. तपास विशेष पथकाकडे
देण्यापूर्वी बदलापूर पोलीसांनी काय केलं? त्याची कागदपत्रं कुठे आहेत?
पीडीत मुलींचं समुपदेशन केलंत का?, असे सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारले.
यावर राज्य सरकारच्या वकिलांनी म्हटले की, पहिल्या पीडीत मुलीचं समुपदेशन
झालेलं आहे, दुसऱ्या मुलीचं समुपदेशन सुरू आहे. घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी झाली,
पालक 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यात आले. याप्रकरणी काल, 21 ऑगस्ट रोजी
एसआयटी स्थापन झाली आहे. संबंधित पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना
निलंबित केलेलं आहे. घटना लपवल्याबद्दल शाळेवर कारवाई करणार,
असे महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले.
यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे
निर्देश दिले. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, प्रश्न शाळेतील मुलींच्या सुरक्षेचा आहे.
लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे,
असे खडे बोल हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले.
न्यायमूर्तींनी महाअधिवक्ता यांच्यावर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली.
पीडीत मुलांच्या पालकांचे जबाब नोंदवलेत का? बदलापूर पोलीसांनी केलं काय?,
असे सवाल विचारताच महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ निरुत्तर झाल्याचे दिसून आले.
बदलापूर पोलिसांनी याप्रकरणात काहीच कारवाई केल्याचे दिसत नाही.
इतक्या गंभीर प्रकरणात पोलीसांचा हा अक्षम्य हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
कारवाईचे आदेश देताना आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही खंडपीठाने
राज्य सरकारला दिला. त्यामुळे आता यावर राज्य सरकार मंगळवारी दुपारी होणाऱ्या
सुनावणीत काय बाजू मांडणार, हे पाहावे लागेल.
Read also: https://ajinkyabharat.com/yuvraj-singh-biopic-announced/