अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण; खरेदीसाठी सुवर्णसंधी

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण; खरेदीसाठी सुवर्णसंधी

आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.

पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.

गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर होते,

Related News

मात्र आता त्यात घसरण झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावर दिलासा झळकत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा जुनचा वायदा 0.4 टक्क्यांनी म्हणजेच 384 रुपयांनी कमी झाला आहे.

प्रतितोळा सोनं आता 95,353 रुपयांवर आले आहे. चांदीच्या दरातही घसरण दिसून आली

असून ती 0.77 टक्के म्हणजेच 749 रुपयांनी कमी होऊन 96,113 रुपये प्रतिकिलोवर स्थिरावली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही घसरण डॉलरमध्ये मजबुती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार

तणावात घट झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर कमी झाले आहेत.

स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी घसरून $3,308.32 प्रति औंसवर पोहोचले आहे.

तर युएस गोल्ड फ्युचर्स 0.5 टक्क्यांनी कमी होऊन $3,317.50 वर आले आहेत.

मुंबईतील सोन्याच्या किंमती (प्रतिक्रॅम दर)

  • 24 कॅरेट सोनं: ₹9,798

  • 22 कॅरेट सोनं: ₹8,981

मुख्य दरावरील झलक (10 ग्रॅमसाठी)

  • 22 कॅरेट: ₹89,750

  • 24 कॅरेट: ₹97,910

  • 18 कॅरेट: ₹73,440

मुंबई आणि पुण्यात आजचे दर

Related News