अकोटात एस.टी. बसला अपघात; मागील दोन्ही चाके निघाली, सुदैवाने जीवितहानी टळली

अकोटात एस.टी. बसला अपघात; मागील दोन्ही चाके निघाली, सुदैवाने जीवितहानी टळली

अकोट | प्रतिनिधी – विशाल आग्रे

शहरातील दर्यापूर रोडवरील श्रद्धासागर परिसरात आज सकाळी साडेदहा वाजता अमरावती

आगाराची एस.टी. बस (MH 40 N 9515) अपघातग्रस्त झाली.

Related News

बसच्या मागील दोन्ही चाके अचानक निघून गेल्याने एकच खळबळ उडाली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही,

मात्र प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

मुख्य मुद्दे:
🔸 बस अपघातग्रस्त, पण प्रवासी सुखरूप
🔸 एस.टी. महामंडळाच्या भंगार बसेसवर प्रश्नचिन्ह
🔸 यापूर्वीही अकोटमध्ये अनेक अपघात – एक शिक्षक कायमचे अपंग
🔸 पोपटखेड रोडवर एस.टी. बसला आग

अकोट तालुक्यात भंगार बसमुळे अपघातांची मालिका सुरूच असून,

यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अपघात टाळण्यासाठी एस.टी. महामंडळाने तातडीने कारवाई करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/sonyache-dagin-bachranya-accusedla-stuck/

Related News