अजित पवार गटातील नेते सचिन कुर्मी यांची हत्या!

भायखळा परिसर हादरलं

मुंबईतील भायखळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील नेते सचीन कुर्मी यांची

Related News

हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजकारणात एकच

खळबळ उडाली आहे. या हत्येमागे कोण आहे? याचा शोध

पोलिसांकडून घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचीन

कुर्मी हे भायखळा येथील तालुका अध्यक्ष होते. काल रात्री

त्यांच्यावर एका अज्ञाताने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात

दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भायखळा

येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांना

घटनेची माहिती मिळताच, आरोपीचा शोध सुरु केला आहे.

पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप

कोणालाही अटक करण्यात आलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या

माहितीनुसार, आरोपीने सचीन कुर्मी यांच्यावर म्हाडा परिसरात

असताना हल्ला केला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना

तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जे. जे रुग्णालयात

उपचार सुरु होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह

शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सचीन कुर्मी यांच्या

मृत्यूनंतर भायखळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या

प्रकरणी पुढील तपासणी- चौकशी सुरु आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/inauguration-of-banjara-heritage-today-by-prime-minister-narendra-modi/

Related News