अकोला: अकोला जिल्ह्यात मंदीरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या आरोपींविरोधात स्थानिक
गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून,
या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
Related News
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा अकोला दौरा; अकोट येथे विवाह समारंभास उपस्थिती
संशयास्पद माहितीवर विश्वास ठेवू नका;
सराफा दुकानात पुन्हा ‘बंटी-बबली-आजी’ टोळीचा हात;
अकोल्यातील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात मोठा खुलासा; किरीट सोमय्यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
आपत्कालीन स्थितीसाठी तयार राहा!
चेन चोरी करणाºया महिलेला सहा तासात केली अटक
मान्सून लवकर येणार! महाराष्ट्रात १० जूननंतर पावसाची शक्यता
भारतीय सेनेला विराट कोहलीचा सलाम
सायरन कधी वाजतो? – हवाई हल्ल्याच्या धोक्यावेळी नागरिकांना मिळतो किती वेळ वाचण्यासाठी?
जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे आवाहन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही दलप्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक;
गुन्ह्यांचा तपास व अटकेची कारवाई:
अकोला जिल्ह्यात मंदिर दानपेटी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस निरीक्षक
शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला निर्देश दिले होते.
त्यानुसार, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे शिवणी परिसरात संशयित
आरोपी दीपक प्रकाश डोंगरे (वय २४, रा. आंबेडकर नगर, शिवणी, अकोला)
यास ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान, त्याने आपल्या साथीदार नागेश परसराम सावकार
(वय २६, रा. आंबेडकर नगर, शिवणी, अकोला) सोबत मिळून मंदिरातील दानपेट्या फोडल्याची कबुली दिली.
या आरोपींनी पुढील गुन्ह्यांची कबुली दिली:
- पो.स्टे. उरळ (अप क्र. ४११/२०२४, कलम ३३४(१), ३०५(अ) भा.न्या.सं.)
- पो.स्टे. बार्शीटाकळी (अप क्र. १६९/२०२४, कलम ३७९ भा.दं.वि.)
- पो.स्टे. पातुर (अप क्र. २२४/२०२४, कलम ३७९ भा.दं.वि.)
पोलिसांनी नमूद आरोपींकडून सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला असून,
पुढील तपासासाठी आरोपींना पो.स्टे. उरळ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांची विशेष भूमिका:
या कारवाईसाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय
डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके, स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण,
तसेच स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अमंलदार दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, खुशाल नेमाडे,
वसिनोद्दीन, स्वप्निल खेडकर, थिरज वानखडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, लिलाधर खंडारे, मोहम्मद आमीर, सतिश पवार यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
🔹 अधिक तपास सुरू असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.