दिल्ली हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस (12431)च्या दोन डब्यांना रविवारी पहाटे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आलोट आणि विक्रमगड रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
प्राथमिक माहितीनुसार, तिरुवनंतपुरमहून हजरत निजामुद्दीनकडे जाणारी राजधानी एक्सप्रेस रतलामहून पुढे रवाना झाल्यानंतर ही दुर्घटना घडली. आग लागल्यानंतर दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत.
रविवारी पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास लुनी रिछा आणि विक्रमगड आलोट स्थानकांदरम्यान ट्रेनच्या बी-1 डब्यात आग लागली. गार्डने तात्काळ लोको पायलटला माहिती दिल्यानंतर ट्रेन लगेच थांबवण्यात आली.रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सुमारे 68 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून इतर डब्यांमध्ये हलवले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले.
Related News
दिवाळीपूर्वी FDA ॲक्शन मोडमध्ये! 1,057 आस्थापनांची तपासणी, 94 परवाने निलंबित
ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा भडका! राजन विचारे संतप्त, पोलिसांना विचारले ५ थेट सवाल
5 पैकी 3 जागांवर विजय हर्षदा देशमुखांचा बोगस मतदानाबाबत गंभीर आरोप
महायुतीत मोठा संशय! ‘मातोश्री प्रेमी’ कोण? नितेश राणेंच्या विधानाने राजकीय खळबळ
स्पेनमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना! 2 हायस्पीड ट्रेनची धडक; 50 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त
नव्या कारचा आनंद क्षणात मावळला! 24 तासांत गाडीवर ओरखडे, शेजाऱ्यांवर संशय
नागपूरला 2 भूकंपाचे धक्के! 15 मिनिटांत जमीन हादरली, नागरिकांमध्ये मोठी खळबळ
संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर मोठा आरोप! 3 गंभीर मुद्द्यांवरून राजकीय वाद पेटला
Israel Election 2026: नेतन्याहूंची सत्ता टिकणार की जाणार? इस्रायलच्या निकालाकडे जगाचं लक्ष!
मुंबईत ATS चा मोठा दणका! जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध, माहिममधून 33 वर्षीय तरुणाला अटक
जळगावच्या किनगावात RSS पथसंचलनाला विरोध; दगडफेकीनंतर तणाव, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
500 कोटींच्या ऑडिओ बॉम्बनंतर जरांगेंचं फडणवीस-शिंदेंना थेट चॅलेंज!
ही घटना कोटा रेल्वे विभागाच्या हद्दीत घडली आहे. आगीत दोन डबे पूर्णपणे जळून खाक झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे नवी दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक गाड्या विविध स्थानकांवर रोखण्यात आल्या आहेत.
रतलाम रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मुकेश कुमार यांनी सांगितले की, सकाळी 5.20 वाजता कोटा कंट्रोलकडून ट्रेन क्रमांक 12431 च्या बी-1 डब्याला आग लागल्याची माहिती मिळाली. ही घटना कोटा विभागातील लुनी रिछा आणि विक्रमगड आलोट स्थानकांदरम्यान घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रतलामहून अपघात निवारण ट्रेन आणि टॉवर वॅगन घटनास्थळी रवाना करण्यात आली. या घटनेमुळे काही रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.रतलाम विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) अश्विनी कुमार यांनीही घटनास्थळी भेट दिली. आग आता पूर्णपणे विझवण्यात आली असून जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल घटनास्थळी तैनात आहेत.
