जिओ-ब्लॅकरॉकला सेबीने दिली मंजुरी
भांडवली बाजार नियामक संस्था सेबीने म्युच्यूअल फंड मार्केटशी
निगडीत मोठा निर्णय घेतला आहे. सेबीने जिओ आणि ब्लॅकरॉक
Related News
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
यांना म्युच्यूअल फंडात येण्यास मंजुरी दिली आहे. उद्योगपती
मुकेस अंबानी यांच्या नेतृत्त्वातील जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस
च्या म्युच्यूअल फंडातील प्रवेशामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढू
शकते. जिओ फायनॅन्शियलने शुक्रवारी एक्स्चेंज फायलिंगमध्ये
याबाबत अधिक माहिती दिली आहे. जिओ फायनॅन्शियलने
दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर रोजी ब्लॅकरॉक फायनॅन्शियल
मॅनेजमेंटसोबतच्या संयुक्त व्हेंचरला म्युच्यूअल फंडात प्रवेश
करण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. जिओ आणि
ब्लॅकरॉक या दोन्ही कंपन्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सेबीकडे
सुपूर्द केल्यानंतर त्यांच्या या व्हेंचरला अंतिम मंजुरी दिली जाईल.
या दोन्ही कंपन्यांनी जुलै 2023 मध्ये एकमेकांशी करार केलेला
आहे. म्युच्यूअल फंड मार्केटमध्ये प्रवेश मिळावा या दोन्ही
कंपन्यांनी संयुक्तपणे ऑक्टोबर 2023 मध्ये परवान्यासाठी
सेबीकडे अर्ज केला होता. या दोन्ही कंपन्या त्यांच्या नव्या
प्रकल्पासाठी 15-15 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत.
जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या
वित्तीय सेवा देता. अगोदर ही कंपनी रिलायन्स उद्योग समूहाची
एक उपकंपनी होती. ऑगस्ट 2023 मध्ये ही कंपनी शेअर
बाजारावर सूचिबद्ध झाली. जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस या
कंपनीची उपकंपनी जिओ फायनान्स या कंपनीकडे एनबीएफसीचा
परवाना आहे. याच कंपनीची जिओ पेमेंट्स बँक ही आणखी एक
उपकंपनी आहे. जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस या कंपनीला
एनबीएफसीतून कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीत बदलण्यास
आरबीआयने मंजुरी दिली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-factional-leader-sachin-kurmi-murdered/