छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात
आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर येथील जंगलात नक्षलवादी
आणि पोलीस यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत
Related News
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरे...
Continue reading
ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनतेची खप्पामर्जी?
८९ टक्के अमेरिकन नागरिकांना वाटतोय सरकारमध्ये व्यापक भ्रष्टाचार; दोन दशकांतील उच्चांक
वॉशिंग्टन : अमेरि...
Continue reading
कोल्हापुरात तुफान राडा! राजू शेट्टी-राजेश क्षीरसागर समर्थक आमनेसामने; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा च...
Continue reading
भारत-चीनला नेपाळचा मोठा झटका! मदत नको, थेट नुकसानभरपाई द्या; UN मध्ये मांडणार मुद्दा
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरानंतर परिस्थिती अद्यापही ग...
Continue reading
1 डॉलरच्या नाण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो; अमेरिकेत नव्या नाण्यावरून कायदेशीर आणि राजकीय वाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या छायाचित्राचा समावेश असलेले
Continue reading
7.8% GDP वरून देशात चर्चा; पंतप्रधान मोदींचं पुन्हा भाष्य, भारत-बेल्जियम सहकार्यावर भर
GDP : भारत दौऱ्यावर आलेले बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी या...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Mumbai–Pune बुलेट ट्रेनची घोषणा! दिवसातून दोनदा वडापाव-बाकरवडी खाण्यासाठी जाता येणार; 2027 मध्ये पहिली एसी लोकल धावणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; मुंबईसाठी 238...
Continue reading
EV कारचे टायर पेट्रोल-डिझेल गाड्यांपेक्षा लवकर गुळगुळीत का होतात? जाणून घ्या ‘ही’ 3 प्रमुख कारणं आणि टायरची झीज रोखण्याचे उपाय
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशभरात इले...
Continue reading
विद्यानंद बापटांवर हल्ला का केला? हल्लेखोर संतोष चव्हाणने सांगितले कारण; VIDEO समोर
गणेशोत्सव, डीजे आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून वाद; हल्ल्यानंतर फरार झालेल्या संतोष चव्हाणला पोलि...
Continue reading
एक्सपायरी डेट म्हणजे निव्वळ शाई नव्हे, तो तर विश्वासघात! Tukaram Mundhe यांचा भेसळखोरांना सज्जड इशारा
Tukaram Mundhe : अन्नपदार्थ आणि औषधांमध्...
Continue reading
आतापर्यंत ३२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस आणि
सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आलं आहे. नक्षलवाद्यांच्या
विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष
म्हणजे सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात अजूनही चकमक
सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे चकमकीत मारल्या
जाणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या
चकमकीत पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवान जखमी किंवा
कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली
नाही. पण या कारवाईत पोलिसांना नक्षलवाद्यांकडील एके ४७
सारखे अनेक हत्यार, तसेच स्फोटके बनवण्याचं सामान मिळाले
आहे. सर्व हत्यार पोलिसांनी जप्त केले आहेत. स्थानिक पोलिसांना
नक्षलवाद्यांबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली होती. नारायणपूर-
दंतेवाडी सीमेवर माड परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी
असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा
दलाच्या जवानांकडून संयुक्तरित्या अँट नक्शल ऑपरेशन सुरु
करण्यात आलं. यावेळी नक्षलवाद्यांकडून पोलिसांच्या दिशेला
गोळीबार सुरु करण्यात आला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून
गोळीबार सुरु केला. गडचिरोलीपासून अडीचशे किलोमीटरवर हे
घटनास्थळ आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा व नारायणपूर या दोन
जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील दक्षिण अबूझमाडमध्ये काही
नक्षली दबा धरुन बसल्याची माहिती छत्तीगडच्या सुरक्षा यंत्रणेला
मिळाली होती. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी
संयुक्तपणे नक्षल्यांविरोधात अभियान राबविले. यावेळी अचानक
जवानांच्या दिशेने नक्षल्यांनी गोळीबार केला. या चकमकीत
आतापर्यंत ३२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश
आलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mukesh-ambani-mutual-fund-entry/