Baramati : बारामती-पारवडी मार्गावर काल उशिरा रात्री भीषण अपघात घडून एका चौकोनी कुटुंबावर काळाने झडप घातली. या दुर्घटनेत आई आणि पाच वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून पती आणि दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर कोकणे हे त्यांच्या पत्नी रूपाली कोकणे, पाच वर्षांची मुलगी सानवी आणि दोन वर्षांचा मुलगा यांच्यासह दुचाकीवरून बारामतीहून पारवडीकडे निघाले होते. खासगी काम आटोपून ते घरी परतत असताना बारामती-कटफळ-पारवडी मार्गावरील परीट वस्ती परिसरात हा भीषण अपघात झाला.दरम्यान, खडकीकडून बारामतीच्या दिशेने येणाऱ्या एका वेगाने धावणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले. अपघात इतका भीषण होता की रूपाली कोकणे आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी सानवी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात मयूर कोकणे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.अपघातानंतर चारचाकी वाहन चालकाने आपले वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांकडून तपास सुरू आहे.
Related News
पुणे : शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असताना, उलट Pune Mah...
Continue reading
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पर्वती परिसरात एका मानसिकदृष्ट्या
Continue reading
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आनंदोत्सवात संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण असताना यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली ...
Continue reading
करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे घडलेली घटना; महिला गंभीर जखमी, सात आरोपी अटकेत
करमाळा तालुक्यातील करमाळा तालुका येथील वरकटणे गाव परिसरात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली...
Continue reading
राज्यात भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर ...
Continue reading
भारतीय संगीतविश्वातील अजरामर गायिका Asha Bhosle यांच्या निधनानंतर देशभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या योगदा...
Continue reading
Pune शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि दीर्घकाळ रखडलेल्या कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. सोलापूर–पुणे महामार्...
Continue reading
पुणे पोलिस दलामध्ये एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली असून “रील स्टार” म्हणून ओळखली जाणारी महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिला खंडणी प्रकरण...
Continue reading
राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील सातारा-महाबळेश्वर...
Continue reading
पन्हाळा तालुक्यातील घोटवडे येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घराच्या दारात खेळत असताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने अडीच वर्षीय अन्वीक संदीप जाधव ...
Continue reading
ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम भागात एका उच्चभ्रू सोसायटीत घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निवृत्त पोलीस उपायुक्ताने (DCP)
Continue reading
दरम्यान, या अपघातामुळे बारामती-पारवडी मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर वेगाने धावणारी वाहने आणि अपुऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/nagpur-news-pichkaricha-raga-aajikadu-natvavar-boiling-water-nagpurat-four-year-old-chimukala-45-takka-bhajala/