पातूर तालुक्यातील खेट्री ग्रामपंचायतीत गेल्या तीन वर्षांत तब्बल सात सचिव बदलल्याने प्रशासनाचा कारभार अक्षरशः ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम होत असून विकासकामे रखडली आहेत. नव्याने नियुक्त होणारे सचिव काही महिन्यांतच बदलीची मागणी करत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सचिवांवर अनावश्यक दबाव टाकला जातो, निर्णयप्रक्रिया अनेकदा एकतर्फी होते तसेच नियमबाह्य कामांसाठी आग्रह धरला जातो. अशा वातावरणात काम करणे कठीण होत असल्याने सचिव दीर्घकाळ टिकत नाहीत, अशी चर्चा गावात रंगत आहे. परिणामी महत्त्वाची कागदपत्रे, दाखले, कर वसुली, नोंदी अद्ययावत करणे आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांसारखी मूलभूत कामे विस्कळीत झाली आहेत.
याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. जन्म-मृत्यू दाखले मिळवण्यासाठी, मालमत्ता नोंदणीसाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना वारंवार ग्रामपंचायतीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. काही प्रकरणे महिनोनमहिने प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनातील अस्थिरतेमुळे गावाच्या विकासाला खीळ बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Related News
अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बिलाखेड गावाजवळ चार महिलांना कारने धडक...
Continue reading
3 किलो सोन्याची नाणी 50 लाखांत देण्याचे आमिष, कोल्हापूरच्या हॉटेल व्यावसायिकाची अकोल्यात 15 लाखांची धक्कादायक फसवणूक
अकोला : स्वस्तात मोठ्या प्रमाणावर सोनं मिळणार असल्याचे आमिष दा...
Continue reading
कल्याणमध्ये हृदयद्रावक घटना! खाऊ आणायला गेलेल्या 24 वर्षीय महिलेचा विजेच्या शॉकने मृत्यू; पोलिसावर 'खर्चा-पाणी' मागणीचा गंभीर आरोप
कल्याण: कल्याण पूर्वेतील हनुमान ...
Continue reading
महागाव तहसील कार्यालयास ‘गोदावरी अर्बन’कडून वॉटर कुलर भेट; नागरिकांना मिळणार शुद्ध व थंड पाण्याची सुविधा
सामाजिक बांधिलकी जपत बँकिंग सेवेसोबत समाजोपयोगी उपक्रम राबवि...
Continue reading
मोर्णा नदीवरील पुलाची उंची वाढवा; १७ ते १८ गावांचा प्रश्न ऐरणीवर – ग्रामस्थांचा तीव्र इशारा
अकोला व अमरावती जिल्ह्यांना जोडणाऱ्या अदुरा–गांधीग्राम मार्गावरील मोर्णा नदीवरील पुलाची...
Continue reading
अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द ते करी या मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, वाहनधारक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. क...
Continue reading
साई टेकडी तलावातील भीषण दुर्घटना; 6 मित्रांपैकी 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगर शोकसागरातछत्रपती संभाजीनगर शहराला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटू...
Continue reading
मूर्तिजापूरमध्ये घरकुल लाभार्थ्यांवर वाळू घाटांवर ‘अतिरिक्त वसुली’चा आरोप; मोफत योजना कागदावरच असल्याची चर्चा
शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचे घर बांध...
Continue reading
संग्रामपूर तालुक्यातील चोंडी येथे रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी बौद्ध विवाह विधी संस्कार सोहळ्याचे अत्यंत उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात आयोजन करण्यात आले. या...
Continue reading
सातबारा उतारा बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जमीन नोंदी प्रणालीत मोठा बदल होणार आहे. शेतीच...
Continue reading
पालघरमध्ये 1 चिमुकलीच्या भाषणाने सचिन तेंडुलकर भारावला – प्रेरणादायी घटना ठरली चर्चेचा विषय
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गुहीर गावात एक अत्यंत प्रेरणादायी आणि...
Continue reading
आंध्र प्रदेशात धार्मिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री N. Chandrababu Naidu यांनी राज्यभरात पुढील दोन ...
Continue reading
दरम्यान, तत्कालीन सचिव बी. बी. आडे यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी निलंबित केल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांकडून अनेक सचिवांना खेट्रीचा कार्यभार स्वीकारण्याची विनंती करण्यात आली; मात्र तालुक्यातील बहुतेक सचिवांनी हे गाव घेण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामपंचायत सचिवविरहित आहे.
ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून खेट्रीसाठी स्थिर व सक्षम सचिवाची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. प्रशासन सुरळीत होऊन प्रलंबित कामांना गती मिळावी आणि गावाच्या विकासाला चालना मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/5-shocking-reasons-behind-mumbai-luxury-homes-boom-abjadhishanchi-shocking-competition/