नागपुरात महिंद्राचा 15 हजार कोटींचा मेगा प्लांट; विदर्भात देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प – देवेंद्र फडणवीसांची घोषणा
नागपूर : विदर्भाच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. दावोस दौऱ्यानंतर नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या **‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026 : खासदार औद्योगिक महोत्सवा’**च्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी विदर्भाला उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या मोठ्या संधी मिळणार असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये नागपुरात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा तब्बल 15 हजार कोटी रुपयांचा मेगा ऑटोमोबाईल प्लांट तसेच विदर्भातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प या दोन घोषणा विशेष ठरल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आतापर्यंत विदर्भात विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक येत होती, मात्र ऑटोमोबाईल उद्योग मोठ्या प्रमाणावर येथे आला नव्हता. ही उणीव आता भरून निघणार असून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी नागपुरात नेक्स्ट जनरेशन ईव्ही आणि इतर वाहनांच्या निर्मितीसाठी एकात्मिक ऑटोमोबाईल प्लांट उभारणार आहे. या प्रकल्पात सुमारे 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्याचे उत्पादन 2028 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी सप्लाय युनिट छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात येणार आहे. पुण्यानंतर आता नागपूर, संभाजीनगर आणि नाशिक हे ऑटोमोबाईल उद्योगाचे नवे केंद्र म्हणून विकसित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दहा वर्षांत विदर्भाचा चेहरा बदलल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, गडचिरोली आणि परिसरातील खनिज संपत्तीवर वर्षानुवर्षे चर्चा होत होती, मात्र 2014 नंतर प्रत्यक्ष कृती सुरू झाली. गडचिरोलीत ग्रीन स्टील प्रकल्प, चीनपेक्षाही स्वस्त स्टील उत्पादन, तसेच संपूर्ण परिसरात औद्योगिक इकोसिस्टीम तयार होत आहे. औद्योगिक विकासासाठी ‘मॅग्नेट हब’ आवश्यक असतात आणि त्या माध्यमातून आसपासचा विकास घडतो, असेही त्यांनी नमूद केले.
Related News
पालकांसाठी महत्त्वाच्या टिप्स! मुलांच्या योग्य संगोपनाचा सोपा मंत्र
भारताचा ‘Rice Capital’ कोणता राज्य? उत्तर ऐकून थक्क व्हाल!
‘Dhurandhar 2’च्या यशानंतर रणवीर-दीपिकाचा साधा सेलिब्रेशन; डोसा डेटचा फोटो व्हायरल
जगातील सर्वात मोठी नोट! ‘1 कोटी’ असूनही भारतात फक्त 650 रुपयांची किंमत
पेट्रोल टंचाईच्या अफवेने टाकी फुल केली आणि दुचाकी पेटली! अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना
एकदाच ₹365 रिचार्ज करा आणि IPL मोफत पाहा; जिओचा भन्नाट प्लॅन चर्चेत
अशोक खरातला पोस्कोचा दणका! राजकीय वर्तुळात खळबळ
दररोज 2 हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरात होतात आश्चर्यकारक बदल! तज्ज्ञांचे महत्त्वाचे खुलासे
राजकारणात खळबळ! शरद पवारांचे चार खासदार शिंदेंच्या संपर्कात?
विदर्भातील पायाभूत सुविधांबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, नागपुरात टाटा एरोस्पेसचे सेंटर ऑफ एक्सलन्स, सोलर मॉड्युल उद्योग, तसेच लवकरच आणखी 5 हजार हेक्टर जमीन औद्योगिक वापरासाठी अधिग्रहित केली जाणार आहे. अमरावती येथे आशियातील सर्वात मोठे एव्हिएशन स्कूल उभारले जात असून जुलै महिन्यात त्याचे उद्घाटन होणार आहे. गडचिरोली येथे विमानतळाचे काम सुरू असून ते “गेटवे टू साउथ इंडिया” म्हणून विकसित केले जाईल.
यासोबतच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नदीजोड प्रकल्पाची घोषणा केली. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीला बुलढाण्यातील नळगंगा नदीशी 500 किलोमीटर लांबीच्या कृत्रिम नदीद्वारे जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार असून, सिंचन व्यवस्था मजबूत होईल आणि पाण्यावर अवलंबून असलेले उद्योगही विदर्भात आकर्षित होतील. या प्रकल्पाची सुरुवात याच वर्षी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी 30 लाख कोटी रुपयांची, तर विदर्भासाठी पावणे चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यात आल्याची माहिती देत, विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केला.
