“महावितरणच्या दीक्षाभूमी व खामला उपकेंद्रांना ISO 9001:2015 मानांकन – नागपूरमधील वीज सेवा जागतिक दर्जाची”

महावितरण

भारतीय प्रजासत्ताक दिनापूर्वी महावितरणच्या नागपूर परिमंडलाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. काँग्रेस नगर विभागांतर्गत येणाऱ्या दीक्षाभूमी आणि खामला या दोन अत्यंत महत्त्वाच्या 33/11 केव्ही उपकेंद्रांना जागतिक दर्जाचे ‘आयएसओ 9001:2015’ गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. या यशामुळे महावितरणच्या सेवा गुणवत्तेला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे आणि नागपूरमधील ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होणार आहे.

दीक्षाभूमी आणि खामला उपकेंद्र नागपूर शहरातील सामाजिक, ऐतिहासिक व व्यावसायिक दृष्ट्या संवेदनशील भागांना वीज पुरवठा करतात. या उपकेंद्रांत दीक्षाभूमी परिसर, बजाज नगर, श्रद्धानंद पेठ, आठ रस्ता, सेंट्रल बाजार रोड, वसंत नगर, जयप्रकाश नगर, मालवीय नगर, टेलीकॉम नगर, खामला, इंद्रप्रस्थ नगर, कलश अपार्टमेंट आणि दीनदयाळ नगर यांसारख्या गर्दीचे आणि महत्त्वाचे भाग समाविष्ट आहेत. महावितरणच्या ‘इज ऑफ लिविंग’ संकल्पनेनुसार या भागातील ग्राहकांना तांत्रिक बिघाडमुक्त, उच्च दाबाचा अखंडित वीज पुरवठा मिळावा, यासाठी उपकेंद्रांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू होते.

आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवण्यासाठी उपकेंद्रांच्या कामकाजात आमूलाग्र बदल करण्यात आले. यामध्ये सर्व यंत्रसामग्री आणि सुरक्षा प्रणालींची कडक तपासणी व नूतनीकरण, ट्रान्सफॉर्मर व उच्च-दाब व लघुदाब वीज वाहिन्यांची नियमित देखभाल, ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण आणि पारदर्शक कामकाज यांचा समावेश आहे. उपकेंद्र परिसराचे सुशोभीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जागतिक मानके लागू करण्यात आली.

Related News

या यशात उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचा स्वेच्छेने घेतलेला पुढाकार आणि ‘टीम वर्क’ विशेष महत्त्वाचा ठरला. नागपूर परिमंडळाचे प्रादेशिक संचालक श्री. परेश भागवत, मुख्य अभियंता श्री. दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता श्री. अमित परांजपे व कार्यकारी अभियंता श्री. राहुल जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प यशस्वी झाला.

अतिरिक्त कार्यकारी अभियंते जयंत ठाकरे, प्रशांत काकडे, रमेश नागदेवते, सहायक अभियंते अभिलाष बारापात्रे, प्रशांत शेंडे, राहुल चिंतलवार यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच, यंत्रचालक सुशांत शृंगारे, मंगला भांगे, मुकेश वानखेडे, रवींद्र दुरतकर, उमेश गावंडे, परशुराम दिघोरे, परीक्षित भालेराव व काँग्रेस नगर विभागातील दुरुस्ती पथकाने अहोरात्र परिश्रम घेतले.

महावितरणच्या वरिष्ठ प्रशासनाने संपूर्ण चमूचे कौतुक केले असून, या यशामुळे नागपूरमधील ग्राहकांना अधिक विश्वासार्ह, उच्च दर्जाची वीज सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/prakash-ambedkarancha-5-serious-allegations-against-girish-mahajan-demand-for-withdrawal-of-cabinet-from-cabinet/

Related News