ओबीसींसाठी प्रकाश आंबेडकर सरसावले!

मराठा

मराठा व ओबीसी आरक्षण यावरुन नेत्यांमध्ये

खडाजंगी होताना दिसत आहे.

ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत.

Related News

तर मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे,

अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे.

त्यामुळे आरक्षण प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले

तरी अनेकांनी त्यांच्या भूमिकेला आणि वादग्रस्त विधानांना विरोध दर्शवला आहे.

यामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ,

भाजपचे प्रकाश लाड व प्रवीण दरेकर तसेच लक्ष्मण हाके यांनी देखील

जरांगे पाटलांविरोधात आवाज उठवला आहे.

आता यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते

प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे.

ओबीसी बचाव यात्रा काढत ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये,

अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

याबाबत माहिती देताना त्यांनी शरद पवार

व जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/resolution-against-neet-approved-in-west-bengal-assembly/

Related News