मूर्तिजापूर प्रतिनिधी :
शिक्षण, सेवा आणि संस्कारांचा वारसा जपत आपल्या कलेच्या जोरावर राज्याच्या पटलावर झेप घेणारे मूर्तिजापूरचे सुपुत्र विशाल वैद्य यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शिक्षक, अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धा २०२५ अंतर्गत आयोजित सुलेखन स्पर्धेत त्यांनी विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. येत्या २३ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सुलेखन स्पर्धेत ते अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या यशामुळे जिल्हा परिषद शाळा मोझर तसेच मूर्तिजापूर तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे.
वारसा कलेचा, ध्यास प्रगतीचा
विशाल वैद्य सध्या जिल्हा परिषद शाळा मोझर, केंद्र किनखेड येथे सहाय्यक अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील नामांकित पेंटर असल्याने सुंदर हस्ताक्षर व कलेचा वारसा त्यांना लाभला आहे. त्यांच्या अक्षरातील शिस्त, रचना आणि शब्दांतील सौंदर्य हे सातत्यपूर्ण सराव, परिश्रम आणि कलेवरील निष्ठेचे प्रतीक आहे.
केवळ शिक्षक नव्हे, विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ
वैद्य सरांची ओळख केवळ सुलेखनकार म्हणून मर्यादित नसून ते एक आदर्श शिक्षक म्हणूनही परिचित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरले आहेत. सुटीच्या दिवशीही ते ‘प्रकाशवाट’ संस्थेत विनामूल्य मार्गदर्शन करतात. गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके उपलब्ध करून देणे, तसेच नाश्त्याची सोय करणे, यात ते नेहमी पुढाकार घेतात. त्यांच्या शिकवणीत ज्ञानासोबत संस्कारांची उबही जाणवते.
Related News
NEET Scam 2026: RCC क्लासेस सील, मराठवाड्यातील 300+ पालकांचे लाखो रुपये अडकले; फी परत मिळणार का?
सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात साजरा
संध्या डाहेलकर यांना डॉ. सिंधुताई सपकाळ नारी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
UGC Regulations 2026: धक्कादायक बदल! 7 कडक नियमांमुळे देशभरात तीव्र विरोध का? | Powerful Analysis
श्री जागेश्वर विद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
मूर्तिजापूरात वाद मिटवायला गेलेल्या बँक मॅनेजरवर प्राणघातक हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
जुने पैसे मागण्याच्या वादातून प्राणघातक हल्ला; मूर्तिजापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला
मूर्तिजापूर आगारात इंधन बचत मासिक मोहिमेचा उत्साहात शुभारंभ
वाल्मिक नगरात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
नियमित वाचनाची आवड, कलेची जोपासना आणि समाजाभिमुख कार्य यामुळे वैद्य सरांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद शिक्षण विभाग, शिक्षक संघटना, पालक, विद्यार्थी तसेच मूर्तिजापूरच्या नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या अंतिम फेरीतही ते चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
