भावना पब्लिक स्कूलच्या वंशची अँबॅकस जीनियस स्पर्धेत जिल्हास्तरावर झेप !

अँबॅकस

पातूर : एसआयपी अँबॅकसने अकोला मॅथ जीनियस स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता. एका शानदार पारितोषिक वितरण समारंभात, अकोला येथील चांडक मंगल कार्यालयात अकोला मॅथ जीनियस स्पर्धा सीझन १ च्या आयोजकांनी गौरवशाली विजेत्यांना बक्षिसे प्रदान केली. यामध्ये भावना पब्लिक स्कूल पातुरच्या वंश संजय गोतरकर या फोर्थ स्टॅंडर्ड (४)च्या विद्यार्थ्यांने जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन करीत यशस्वी झेप घेतली आहे.
ही स्पर्धा १४ डिसेंबर रोजी आरएलटी कॉलेजमध्ये पहिली ते पाचवीच्या
मुलांसाठी आयोजित करण्यात आली होती. एसआयपी अॅबॅकसचे मुकेश साहनी यांनी सांगितल्याप्रमाणे लहानपणापासूनच गणितात रस निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश होता.
प्रत्येक वर्गासाठी पहिले, दुसरे आणि तिसरे बक्षीस ३००० रुपये, २००० रुपये आणि १००० रुपये रोख,ट्रॉफी प्रमाणपत्र व प्रत्येक वर्गासाठी १० विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

यामध्ये भावना पब्लिक स्कूल पातुर येथील वर्ग चौथीचा विद्यार्थी वंश संजय गोतरकर यांने घवघवीत यश मिळवल्यामुळे त्याला “परफॉर्मर अवार्ड ” देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष बाब या मॅथ जीनियस अबॅकसस्पर्धेत वंश गोतरकर हा अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातून वर्ग चौथी मधून तो अव्वल ठरला आहे.
याबद्दल त्याचे अबॅकसचे मुकेश सहानी , व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व पालकांच्या उपस्थितीत त्याचा ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच भावना पब्लिक स्कूल पातूरच्या प्राचार्या सरोज सुरवाडे व शिक्षिका पूजा उपरवट, व शिक्षिका
यांनी त्याचा शाळेत गौरव करून शुभेच्छा दिल्या.
….
त्याने आपल्या यशाचे श्रेय भावना पब्लिक स्कूलचे संस्थापक अमोल सोनोने, कार्यकारी संचालिका सरिता तायडे, व सुवर्णा डाखोरे सर्व शिक्षक ,शिक्षिका वृंद व सौ शितल भोसले मॅडम , तसेच आई-वडील ,आजी-आजोबा यांना दिले आहे.
वंश हा डॉ. एच एन सिन्हा महाविद्यालय पातूरचे माजी अधीक्षक सुखदेवराव गोतरकर यांचा नातू आहे. याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/shiv-sena-shinde-group-ally-with/

Related News

Related News