बाळापूर : लोहारा (ता. बाळापूर) येथील ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नातून दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी तात्काळ वितरित करण्यात यावा, अन्यथा येत्या मासिक सभेच्या दिवशी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे. यासंदर्भात दिव्यांग बांधवांनी गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी (पंचायत), बाळापूर यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनानुसार, लोहारा ग्रामपंचायतीअंतर्गत दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी गेल्या पाच वर्षांपासून वाटप करण्यात आलेला नाही. याबाबत वेळोवेळी तोंडी तसेच लेखी अर्ज करूनही ग्रामपंचायत सचिव व सरपंचांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला आहे. निधी मिळत नसल्यामुळे दिव्यांग नागरिकांना दैनंदिन जीवनातील अडचणींना सामोरे जावे लागत असून शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा रोष व्यक्त करण्यात आला आहे.
या निधीच्या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मासिक सभेदरम्यान दिव्यांग बांधव आक्रमक झाले होते. मात्र, त्या वेळी ग्रामपंचायत अधिकारी कोणतीही ठोस भूमिका न मांडता सभास्थळ सोडून निघून गेले होते, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आजारपणाचे कारण पुढे करून संबंधित अधिकारी पुन्हा रुजू झाले नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत संशय निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
Related News
कुरणखेडच्या गजानन महाराज विद्यालयाचा कायापालट! 10 हून अधिक भौतिक सुविधांचे दिमाखात लोकार्पण
कुरणखेड : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत कुरणखेड येथील गजानन महाराज विद्यालयात शैक्षणिक ...
Continue reading
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मानसिक आणि शारीरि...
Continue reading
SC-ST शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन विशेष मोहीम; 31 जुलैपर्यंत महाडीबीटीवर अर्ज, 90% पर्यंत अनुदानाची सुवर्णसंधी
अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी...
Continue reading
बाळापूर, दि. 24 जून : अकोला-वाडेगाव मार्गावरील नकाशी-भरतपूर दरम्यान बुधवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका म...
Continue reading
मामा-भाचीने रेल्वे रुळावर घेतली उडी; 108 रुग्णवाहिकेच्या तत्परतेने वाचले 2 जीव
अकोला जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कौटुंबिक संशय, मानसिक त...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील रहिवासी व निंबा फाटा परिसरातील प्रसिद्ध हार्डवेअर व्यावसायिक शिवशंकर तुळशीराम झाडे (वय 52) यांचा खामगाव रोडवरील भीषण अपघातात जागीच मृत्यू ...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच पातूर तालुक्यातील...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरिया खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. शासनाच्या पूर्वीच्या नियमानुसार केवळ आधार ...
Continue reading
धक्कादायक! एआय व्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेचा छळ; मूर्तिजापूरातील 25 वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा
मूर्तिजापूर | प्रतिनिधीएआय
डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intell...
Continue reading
जळगावच्या जामनेर तालुक्यातील मुकेश डोंगरे या तरुणाने हल्ला करणाऱ्या बिबट्याशी थेट झुंज देत त्याला जिवंत पकडले. या धाडसी घटनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली असून मंत्री गिरीश महाजन...
Continue reading
पातुर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक सचिव सुरेश काकाणी यांनी गुरुवारी (४ जून) पातुर येथे भेट देऊन निव...
Continue reading
अकोला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असताना विविध महसुली प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता केल्याच्या आरोपावरून तत्कालीन उपअधीक्षक तथा सध्या निलंबित असले...
Continue reading
दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. याबाबत विस्तार अधिकारी (पंचायत) गंगाधर गुंडेकर यांनी सांगितले की, दिव्यांगांना पाच वर्षांपासून निधी मिळाल्याची तक्रार प्राप्त झाली असून संबंधित ग्रामपंचायतीला निधी वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. तर प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. भराळे यांनी, नोव्हेंबर महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर बँक खाते बदलण्याची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण होताच लवकरच दिव्यांग बांधवांना निधी वितरित करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या पाच वर्षांत जमा झालेला लाखो रुपयांचा करनिधी नेमका कुठे खर्च झाला, गावात कोणती विकासकामे करण्यात आली, याबाबत ग्रामपंचायतीकडून अद्याप समाधानकारक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या निधीच्या वापराबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
काशिनाथ ढले, रब्बानी देशमुख, आबेद पटेल, निसार देशमुख, सुरेश गुलाब वानखडे, अरमान फकिरा पटेल, अमोल शिवहरी बकाल, रहीम जब्बार देशमुख, नासिर मुजिब अतिक, बाप्पू व आईशा पटेल यांच्यासह अनेक दिव्यांग बांधवांनी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. प्रशासनाने वेळीच सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा ठाम इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/spotify-300tb-data-leak-episode-annas-archive-stole-8-6-crore-songs-digital-security-big-push/