ठाणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मतदार याद्यांतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागांमध्ये तब्बल 67,508 दुबार मतदार असल्याचे पुरावे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सादर केले आहेत.
मतदार यादीत साडेतीन हजारांहून अधिक ‘पंकज, सुरेश आणि रमेश’ अशी एकेरी नावे आढळली असून अनेक ठिकाणी आडनावच गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. “हे नेमके मतदार कोण?” असा सवाल राजन विचारे यांनी उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
शंभर पार मतदारांची संख्या वाढली
मतदार यादीत 100 वर्षांहून अधिक वयाचे तब्बल 562 मतदार सापडले आहेत. इतकंच नव्हे तर 13,811 मतदारांच्या छायाचित्रांमध्ये गंभीर त्रुटी असून अनेकांचे फोटो अस्पष्ट आहेत, काहींच्या रकान्यांमध्ये फोटोच नाहीत, तर काही ठिकाणी फोटो आहेत पण समोर नावच छापलेलं नाही.
Related News
देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून “अखंड काँग्रेस” या संकल्पनेभोवती प्रचंड चर्चा रंगली आहे. Sharad Pawar, Mamata Bane...
Continue reading
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार हे सध्या पंढरपुरात अन्नत्याग आंदोलनावर बसले आहेत. सरकारने जाहीर केलेली कर्जम...
Continue reading
संजय राऊत यांच्या अर्थखात्यावरील वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. रोहित पवार, उद्धव ठाकरे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांब...
Continue reading
भाजप आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र प...
Continue reading
सारंग लखानींचा दमदार डान्स : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रेवती यांचा विवाह नागपूरमधील उद...
Continue reading
Rohit Pawar Hunger Strike: ‘कर्जमाफी फसवीच नाही तर आजारी’; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात, आंदोलनावर ठाम
शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र प...
Continue reading
पंढरपूरातील रोहित पवारांचं आंदोलन ठरलं अपयशी
पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्रित करत अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात ...
Continue reading
राजकारणात मोठी खळबळ! शिवसेना (UBT), काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबत विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण
शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार : देशातील राजकारण पुन्हा एकदा मोठ्या चर्चेच्या केंद...
Continue reading
Devendra Fadnavis: काँग्रेस ‘बुडते जहाज’; राष्ट्रवादी-TMC विलिनीकरणाचा भाजपलाच फायदा, फडणवीसांनी मांडले राजकीय गणित
तृणमूल काँग्रेस (TMC) राष्ट्रवादी काँग्रेससह देशातील विविध प्रा...
Continue reading
रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम; पोलिसांची नोटीस, पंढरपुरात घडामोडींना वेग
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार
Continue reading
रवी राणा-प्रवीण पोटे यांची दिलजमाई : अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक राजकीय घडामोड समोर आली आहे. वर्षानुवर्षे एकमेकांवर जहरी टीका...
Continue reading
सुनेत्रा पवारांचा कडक इशारा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या प्रमुख आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या ठरलेल्या
Continue reading
लिंग, वय आणि EPIC क्रमांकांचा गोंधळ
तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी पुरुषांच्या नावासमोर स्त्रीलिंगाचा उल्लेख, तसेच एकाच मतदाराचं नाव वेगवेगळ्या प्रभागांत वेगवेगळ्या वयासह नोंदवलेलं, आणि वेगवेगळे EPIC क्रमांक दिल्याचे प्रकार समोर आले आहेत.
काही मतदारांची नावे त्यांच्या आईपेक्षा तब्बल 52 वर्षांनी मोठी असल्याचे देखील निदर्शनास आलं आहे.
मुंबईतही मोठी गैरसोय
मुंबईतील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात 30 हजारांहून अधिक दुबार मतदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. येथे मनसे विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांचे नाव बंगाली भाषेत चुकीच्या स्वरूपात नोंदवण्यात आल्याचा आरोप, तसेच त्यांच्या बहिणीचे नावही चुकीच्या धर्मासह नोंदवल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.
७ दिवसांचा अल्टिमेटम – आंदोलनाचा इशारा
राजन विचारे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की—”या सदोष मतदार याद्या तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात; अन्यथा ठाकरे गट शिवसेना रस्त्यावर उतरेल.“मनसेकडूनही 7 दिवसांत 30 हजार दुबार मतदारांची नावे हटवून यादी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडे गंभीर प्रश्न
मतदार याद्यांतील या घोळामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांच्या मतदानाधिकारावरच घाला घालणाऱ्या या त्रुटी तात्काळ दुरुस्त न केल्यास निवडणूक यंत्रणेविरोधात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.
read also : https://ajinkyabharat.com/turmeric-side-effects-7-dangerous-deceptions-consuming-too-much-turmeric-is-a-big-sign-of-kidney-liver-failure/