विराटचा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरं सलग शतक, विक्रमांची बरसात
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत विराट कोहलीने जबरदस्त फॉर्म कायम ठेवत सलग दुसरं शतक झळकावलं आहे. रायपूर वनडेमध्ये 83 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 105 धावांची खेळी करत त्याने टीम इंडियाला भक्कम स्थितीत आणून बसवलं. ही विराटची वनडेतील 53 वी तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 84 वी शतकाची नोंद ठरली.
रांची सामन्यात 135 धावांची अफलातून खेळी केल्यानंतर रायपूरमध्येही विराटने आपली बॅट तळपती ठेवत चाहत्यांना रोमांचित केलं. विशेष म्हणजे या सामन्यात त्याने षटकार मारून आपले खाते उघडले, असा पराक्रम त्याने पहिल्यांदाच केला.
विक्रमी कामगिरी:
Related News
पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल यांचा साखरपुडा मोडला; 6 महिन्यांतच नात्याला पूर्णविराम, आकृतीची भावुक पोस्ट
मार्चमध्ये मोठ्या थाटात झाला होता साखरपुडा; आता आकृतीने सोशल मीडियावर दिली नातं...
Continue reading
Vaibhav Sooryavanshiला संघातून वगळल्याने श्रीकांत संतापले; पत्नीनेही विचारला सवाल, नेमकं प्रकरण काय?
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात
Continue reading
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
Rinku Singh : बेस्ट फिनिशर रिंकू सिंहचं करिअरचं फिनिश का? अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतून वगळण्याचं कारण आलं समोर
T20 : भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक...
Continue reading
जसप्रीत बुमराहच्या कमबॅकसाठी BCCIचा खास प्लॅन; T20 क्रिकेटमधून पुनरागमनाची शक्यता, वर्ल्डकपवर लक्ष!
BCCI : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज ज...
Continue reading
BCCI Rule: रोहित-विराटला खटकलं अन् बीसीसीआयने नियम बदलण्याची तयारी सुरू केली; १० संघांना तातडीने आदेश
IPL 2027 : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्य...
Continue reading
प्रत्येक नो-बॉलसाठी खेळाडू आणि कोचला दंड ठोठवा; सुनील गावस्कर भडकले, म्हणाले—‘तरच हे वठणीवर येतील’
Sunil Gavaskar On Test No Ball
Continue reading
IND vs PAK : आशिया कपला आजपासून सुरुवात; भारत-पाकिस्तान सामन्यात हँडशेक होणार की नाही? प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले...
दुबई : महिला टी-२० आशिया...
Continue reading
अनाया बांगरला ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी; दिग्गज क्रिकेटपटूचा निर्णयाला विरोध, म्हणाली – ‘हे पूर्णपणे चुकीचं’
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बा...
Continue reading
IND vs SL 2nd Test: भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ; नेमकं काय चुकलं?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. या सामन्य...
Continue reading
82 चेंडूत सामन्याचा The End! अवघ्या 35 धावांवर ऑस्ट्रियाचा संघ गारद; 8 खेळाडू शून्यावर, टी20 क्रिकेटमध्ये नकोसा विक्रम
वुमन्स कॉन्टिनें...
Continue reading
विराटने सलग दोन किंवा अधिक वनडे डावांत 11 वेळा शतकांची मालिका पूर्ण केली असून या बाबतीत तो अव्वल स्थानी आहे. एबी डिव्हिलियर्स सहा वेळा हा पराक्रम करू शकला आहे. शिवाय, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत तीन शतकं करणाऱ्या यादीत विराटने न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
रुथुराजसोबत विक्रमी भागीदारी:
तिसऱ्या विकेटसाठी ऋतुराज गायकवाडसोबत 195 धावांची भक्कम भागीदारी करत विराटने टीम इंडियाला 250 धावांचा टप्पा पार करण्यासाठी मजबूत पाया घातला.“वनडेचा खरा किंग” ही उपाधी पुन्हा एकदा सार्थ ठरवत विराट कोहलीने आपल्या अप्रतिम फॉर्मने भारतीय क्रिकेटप्रेमींना अभिमानाचा क्षण दिला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/huge-confusion-in-voter-list-3500-acres-of-boats/