हिवरखेड (ता. अकोट) : अकोट, तेल्हारा आणि हिवरखेड नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी हिवरखेड येथील देशमुख नगर बसस्टॅण्ड परिसरात भव्य जाहीर सभेत नागरिकांना संबोधित केले. मोठ्या प्रमाणावर उत्साहात झालेल्या या सभेला पहिल्यांदाच मुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने परिसरात प्रचंड उत्सुकता होती.
सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, “मी कोणावरही टीका करण्यासाठी आलेलो नाही. आमच्याकडे विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद भाजपामध्ये आहे. प्रत्येक गरिबाला जमिनीचा मालकीहक्क मिळाला पाहिजे, नागरिकांचे जीवनमान बदलणे ही आमची प्राथमिकता आहे.”
तसेच मोदी सरकारच्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी आवाहन केले की, “मोदीजींनी राम मंदिरावर धर्मध्वज फडकवला; त्याचप्रमाणे आपण तिन्ही नगरपालिकांवर भगवा फडकवायचा आहे.”
Related News
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा: मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत दिग्गजांची हजेरी | पाहुण्यांची मोठी यादी चर्चेत
(Sangamner Wedding News: 100 एकरांवर भव्य विवाह...
Continue reading
राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी e-KYC पूर्ण करण्याची अं...
Continue reading
लाडकी बहीण योजनेच्या KYCच्या नावाखाली गैरवर्तन; जळगावातील प्रकरणाने खळबळ, आरोपी फरार
जळगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सरकारी योजनांच्या नावाखाली न...
Continue reading
‘पिक्चर अभी बाकी है’: राघव चड्ढा यांचा AAP वर पलटवार; पंजाबवरील मुद्दे न घेतल्याच्या आरोपांना दिले उत्तर, ‘डिलिटेड पोस्ट्स’वरून वाद वाढला
आम...
Continue reading
AAP मध्ये उफाळलेले अंतर्गत वाद; केजरीवालांचे ‘सिपाही’ Raghav Chadha विरुद्ध आक्रमक, ‘सॉफ्ट PR’, ‘समोसा’ टोमणा आणि ‘मोदी भीती’चे आरोप
आम आदमी पक्षातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर...
Continue reading
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये देशभरातील टेनिस क्रिकेटपटूंना एकत्र आणणाऱ्या ‘प्रेसिडेंट कप ऑफ इंडिया 2026’ या भव्य क्रिके...
Continue reading
लाडकी बहीण योजना : रखडलेल्या हप्त्यांसाठी शेवटची संधी! अर्ज दुरुस्ती आणि ई-केवायसी ३१ मार्च २०२६ पर्यंत करा
राज्यातील लाखो महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आल...
Continue reading
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात अनेक दिवसांपासून विनापरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आल...
Continue reading
अकोट येथील भाऊसाहेब पोटे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील NMMS परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. 24 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार, शाळेचे 133 विद...
Continue reading
लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी; जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होणार – आदिती तटकरे
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्य ...
Continue reading
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.” यावर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.
सभेला आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, अॅड. आकाश फुंडकर (पालकमंत्री), अकोट विधानसभेचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचा पक्षाच्या वतीने परिचय करून देत सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय अग्रवाल, संतोष शिवरकर, डॉ. अमित कावरे, माधव मानकर, डॉ. संजय शर्मा, रमेश दुतोंडे, किरण सेदाणी, उमेश पवार, राजेश रावणकर, हरीश टावरी, गोपाल मोहोळ, मंगेश दुतोंडे, गणेश रोठे, संदीप उगले, संदीप पालीवाल, बाळासाहेब नेरकर, सुदाम राऊत आदी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेने भाजपाच्या ताकदीचे दणदणीत प्रदर्शन घडवून आणले.
read also : https://ajinkyabharat.com/home-voting-facility-is-not-available-in-municipal-council-elections/