अकोट : प्रहार संघटनेची कापूस तात्काळ खरेदीसाठी मागणी, आंदोलनाचा इशारा

अकोट

अकोट – प्रहार संघटनेतर्फे भारत कपास निगमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एकरी ११ क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा निश्चित करून तात्काळ खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू, तालुका शे. अध्यक्ष भैय्यासाहेब डिक्कर, उपजिल्हाध्यक्ष छोटू कराळे, महानगर अध्यक्ष मनोज पाटील, बिट्टू वाकोळे, जीवन खवले यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की शासन व कपास निगमाने खरेदी लवकर सुरू केली नाही, तर पुढील दहा दिवसांत तीव्र आंदोलन होईल. ही मागणी खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश पुंडकर आणि अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनाही निवेदनाद्वारे केली आहे. जीवन खवले यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना योग्य दर आणि वेळेवर खरेदी मिळावी, ही आमची प्रमुख मागणी आहे.”

read also : https://ajinkyabharat.com/inauguration-of-paturat-rashtra-saint-tukdoji-maharaj-and-saint-dnyaneshwar-mauli-death-anniversary-festival/

Related News